Ganesh Festival : ​ सजावटीतूनही रिफायनरीला विरोध  

राजेंद्र बाईत
Tuesday, 18 September 2018

राजापूर - गेल्या वर्षभरापासून रिफायनरी विरोधात असंतोष धगधगत आहे. रिफायनरी विरोधाचे प्रतिबिंब गणेशोत्सवात आरासीत उमटले. रिफायनरी प्रकल्पग्रस्त गावांमधे रिफायनरीवर प्रकाशझोत टाकणारी आरास करून श्री. गणेशाला रिफायनरी हटावचे साकडे घातले आहे. रिफायनरीपूर्वी कोकणचे रूपडे कसे आहे, रिफायनरीनंतर ते कसे आहे यासह विविध आरास  लक्षवेधी आहेत.  

नाणार प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम आहे. गेल्या वर्षभरापासून रिफायनरी प्रकल्पावरून प्रकल्पग्रस्त आणि शासन असा लढा आणि संषर्घ सुरू झाला आहे. त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवात ऊमटले. श्री गणराया चरणी रिफायनरीचे विघ्न हटव असे साकडे आराशीतुन घालण्यात आले आहे. गावांसह या परिसरातील उत्पन्नाचे महत्वाचे साधन असलेली भातशेती, फलोत्पादन आणि मच्छीमारीवर नेमका कशापद्धतीने प्रतिकूल परिणाम होणार आहे यावर आराशीत भाष्य करण्यात आले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival oppose to refinery in Decoration