पुणे : भव्य मिरवणुकीने दापोडीत गणरायाला निरोप

रमेश मोरे
Sunday, 23 September 2018

पुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती बाप्पांच्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी  दापोडीतील रस्ते नागरीकांच्या गर्दीने फुलुन गेले होते.परिसरातील मंडळांनी उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला.

शनिवारी सकाळपासूनच मिरवणूक तयारीसाठी मंडळांची तयारी सुरू होती. येथील विठ्ठल तरूण मंडळ खालची आळी मानाच्या गणपतीची माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी आण्णा बनसोडे, तानाजी काटे, राजाभाऊ बनसोडे आदी उपस्थित होते. सायंकाळी  नगरसेवक रोहित काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.

विठ्ठल तरूण मंडळ वरील आळी गावठाण यांनी मिरवणुकीने गणरायाला निरोप दिला.जॉली क्रिडा प्रतिष्ठाण व शिवशाही ढोलताशा वाद्यपथकाने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला.सजावट व अन्य खर्चाला फाटा देत संकलित झालेली वर्गणी देणगी रक्कम केरळ पुरग्रस्तांना देणार असल्याचे अध्यक्ष रोहन पवार यांनी सांगितले.

समर्थ व्यायाम मंडळाने सजवलेल्या रथातुन बाप्पांना निरोप दिला. शेखर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल काटे, सैफ शेख यांनी मिरवणुकीचे संचलन केले. शिवरूद्र वाद्यपथकाने वादन केले. नरवीर तानाजी मित्रमंडळ, शिवाजी तरूण मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, सुभाष तरूण मंडळ, जय महाराष्ट्र तरूण मंडळ, आझाद मित्र मंडळ आदींनी आकर्षक विद्युत रोषणाई व ढोलताशा पथकाच्या वादनात मिरवणुका काढल्या.

दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळा शिवाजी चौक,मार्गे रेल्वे स्टेशन या मार्गावरून मिरवणुका काढण्यात आल्या.पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाकडुन मिरवणुका दरम्यान चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Visajan in Pune