तबला वादनाने आरती करून बाप्पांना निरोप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थींच्या गणेश परण, व आरती बरोबर दादरा तालातील वेगवेळे तबला वादन सादर करत येथील सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणी अखिल शिवस्मृती मित्र मंडळाच्या गणपती बाप्पास निरोप देण्यात आला. 

विद्यार्थ्यांनी सामुहिक तबला वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पं.नंदकिशोर ढोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चिमुकल्यांचे तबलावादन ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी गणेश परण व आरती बरोबर दादरा तालातील प्रकार सादर केले. तर आरतीचा मान महिलांना देण्यात आला होता. 

तबला वादनासोबत श्री गंगाधर शिंदे यांच्या गायनास रसिकांनी दाद दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बजरंग ढोरे,अक्षय विनोदे व ईतर मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: ganesh visarjan at sanghavi with a tabla permormance