सात दिवसांच्या गणरायाला निरोप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

पिंपरी - ‘गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया..’च्या गजरात बुधवारी शहरातील सातव्या दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. घरगुती आणि काही सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्‍या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. 

चिंचवडगाव येथील थेरगाव पूल घाट, पिंपरी येथील झुलेलाल घाट, प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडी येथील नदीघाट आदींसह शहरातील एकूण २६ ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच विविध घाटांवर गणेशमूर्ती विसर्जनाला सुरवात झाली. काही मंडळांनी वाजतगाजत गणरायाला निरोप दिला. थेरगाव पूल घाट, पिंपरी येथील झुलेलाल घाट या ठिकाणी हौदामध्ये देखील गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्याशिवाय, पिंपरी, वैभवनगर  येथे प्रथमच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी उभारलेल्या चार  कृत्रिम हौदामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आली. 

महापालिकेतर्फे घाटांवर जीवरक्षक, आरोग्य कर्मचारी यांचे पथक कार्यरत होते. विविध घाटांवर विसर्जनासाठी नदीपात्रात तराफा व बोटींची सोय होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh visarjan seven day