गणेशमूर्ती बनविताना आनंदली मुले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 September 2018

सातारा - स्वत:च्या हातून गणेशमूर्ती तयार होताना त्यांच्या चेहऱ्यांवर निर्माण होणारा आनंद काही औरच जाणवत होता. कोणी सिंहासनारूढ, तर कोणी नागावर आरूढ झालेल्या गणेशाच्या मूर्ती बनविल्या आणि त्याचे मनमोहक रूप साकारताच एकच जल्लोष केला... गणपती बाप्पा मोरया..! 

सातारा - स्वत:च्या हातून गणेशमूर्ती तयार होताना त्यांच्या चेहऱ्यांवर निर्माण होणारा आनंद काही औरच जाणवत होता. कोणी सिंहासनारूढ, तर कोणी नागावर आरूढ झालेल्या गणेशाच्या मूर्ती बनविल्या आणि त्याचे मनमोहक रूप साकारताच एकच जल्लोष केला... गणपती बाप्पा मोरया..! 

निमित्त होते ‘सकाळ एनआयई’, रोटरी क्‍लब सातारा कॅप, इनरव्हील क्‍लब सातारा कॅंप, रोट्रॅक्‍ट क्‍लब सातारा कॅंपच्या वतीने साताऱ्यातील दातार शेंदूरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित केलेल्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे. या कार्यशाळेस ‘सकाळ एनआयई’ सभासद मित्रांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. जल्लोषात उत्सव साजरा करतानाही पर्यावरणाचे जतन कसे करता येईल, हे या छोट्या मित्रांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करून दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुक्‍त व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘सकाळ एनआयई’च्या माध्यमातून अनेक कार्यशाळा घेतल्या जातात. त्याअंतर्गत या ‘इको गणपती’ कार्यशाळेत इनरव्हील क्‍लबच्या पदाधिकारी गीता मामणिया आणि त्यांच्या सहकारी किर्ती गुगळे यांनी शाडूपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांकडून अनेक प्रकारच्या मूर्ती बनवून घेतल्या. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळचे सहयाेगी  संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, श्रीरंजन लंबे, अभिजित बर्गे, मधुरांगणच्या सहायक व्यवस्थापिका चित्रा भिसे, तसेच मुख्याध्यापिका शबनम तरडे, रोटरी क्‍लब सातारा कॅंपचे अध्यक्ष संदीप कणसे, सुरेंद्र अंबरदार, अनिल हेडे, राहुल गुगळे, रोट्रॅक्‍टर आनंद सगरे उपस्थित होते.

ब्राझिलियन यास्मीनही रमली 
रोटरी फॉरेन युथ एक्‍स्चेंज प्रोग्रॅममधून साताऱ्यात आलेली ब्राझीलमधील यास्मीन ही युवतीही साताऱ्यातील बालचमूंबरोबरच शाडूचे गणपती तयार करण्यात रमून गेली होती. तिनेही उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार केल्यावर तिचे सर्वांनी कौतुक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2018 Eco Friendly Ganpati Murti Child