
या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले होते. मंदिर परीसर अपुरा पडू लागल्यानंतर 2002 साली सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते उभारण्यात आले होते.
पुण्यातील पाच मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. या मंडळाची स्थापना 1893 साली झाली. 1893 मध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांनी ही मुर्तीची स्थापना केली. 1968 साली 'दगडूशेठ गणपती'ची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्तिकला पुर्ण झाली. ही मुर्ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते.
'दगडूशेठ गणपती'ची मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले आहे. 'यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल,' अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला. संपुर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली.
पुढे 1984 मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात या गणेश मुर्तिची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले होते. मंदिर परीसर अपुरा पडू लागल्यानंतर 2002 साली सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते उभारण्यात आले होते. आता संस्थानच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या संस्थानचे नेतृत्व आहे.