तांदळा एवढी आहे कसबा पेठ गणपतीची मुर्ती!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 September 2018

तांदळा एवढी म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती आहे.

या गणपतीची मुर्ती स्वयंभू असून मूळची तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती साडेतीन फूट उंचीची झाली आहे. तांदळा एवढी म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती आहे. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे.

गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. लग्नाची आणि मुंजीची पहिली अक्षद इथेच ठेवली जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरवात करण्याआधी लोक मोठ्या श्रध्देने येथे नारळ फोडतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Idol Of Kasba Peth Ganapati Pune