ऋतुजा शिंदेने पटकाविला चांदीचा मुकुट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

पिंपरी - लाडक्‍या गणरायाची, त्याच्या अवतार कार्याची माहिती नवीन पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ अर्थात ‘कोण होईल बाप्पाचा मित्र’ ही अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा चांदीचा मुकुट ऋतुजा शिंदे या विद्यार्थिनीने पटकाविला. द्वितीय क्रमांकाची विजेती नेत्रा बोरगावकर हिला चांदीचा हार आणि तृतीय क्रमांकाचा विजेता वैभव कोरे याला चांदीचा करंडा देण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण पिंपरीतील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या आयआयबीआर कॉलेजच्या सभागृहात झाले. मंडळाच्या संचालिका डॉ. आशा पाचपांडे, द लर्निंग लेन्स ॲकॅडमीचे संचालक इमरान शेख, प्रा. विनीत सुतार, माउंट लिटेरा झी स्कूलचे संचालक राहुल कलाटे, पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष जगन्नाथ काटे, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर, न्यू पुणे पब्लिक स्कूलचे संचालक प्रदीप खंदारे, अमृता खंदारे, महापालिकेच्या अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर आदींच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. विजेत्यांना श्रीगणेशाची आभूषणे असलेल्या चांदीच्या वस्तू देऊन गौरविण्यात आले. क्रिएटिव्ह आणि द लर्निंग लेन्स ॲकॅडमी हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. चिलेकर म्हणाले, ‘‘गेल्या ८६ वर्षांपासून ‘सकाळ’ वाचकांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे. गेल्या चार वर्षांपासून ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ पुरवणी प्रसिद्ध केली जात आहे. तिला मिळणारा प्रतिसाद म्हणजे वाचकांनी ‘सकाळ’वर व्यक्त केलेले प्रेम आणि विश्‍वास आहे.’’ जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक मिलिंद भुजबळ यांनी आभार मानले. 

गणपतीच्या विविध नावांची माहिती मिळाली. गणपती ही विघ्नहर्ता देवता आहे. त्याच्या आराधनेमुळे एक ऊर्जा मिळते. इतर सण, उत्सवांपेक्षा गणेश उत्सव अधिक महत्त्वाचा वाटतो. 
- ऋतुजा शिंदे, प्रथम विजेती 

गणपती बाप्पा मला आवडतो. त्याची आरती म्हणायला आवडते. गणेशोत्सवात आयोजित वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आवडते. त्यातून खूप शिकायलाही मिळते. 
- नेत्रा बोरगावकर, द्वितीय विजेती 

गणपती बाप्पाचा उत्सव मला खूप आवडतो, त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोक एकत्र येतात. आनंदोत्सव साजरा करतात. अशा उत्सवांमुळे समाजात एकोपा निर्माण होतो. 
- वैभव कोरे, तृतीय विजेता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My friend shreeganesh Contest competition winner