पुण्यातील गणेशोत्सवात कैद्यांनी अनुभवले आनंदक्षण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 September 2019

गेले कित्तेक वर्ष कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना खुल्या वातावरणात, भर रस्त्यावर श्री गजाननाच्या स्वागताच्या मिरवणुकीत ढोल-ताशा वाजिविण्याची त्यांची कला पुणेकरांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. करागृहात नैराश्‍याचे जीवन जगत असताना या कैद्यांना आनंदक्षण अनुभवता आले. त्यांच्या वादनाला पुणेकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला. 
 

पुणे : गेले कित्तेक वर्ष कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना खुल्या वातावरणात, भर रस्त्यावर श्री गजाननाच्या स्वागताच्या मिरवणुकीत ढोल-ताशा वाजिविण्याची त्यांची कला पुणेकरांसमोर सादर करण्याची संधी मिळाली. करागृहात नैराश्‍याचे जीवन जगत असताना या कैद्यांना आनंदक्षण अनुभवता आले. त्यांच्या वादनाला पुणेकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

सकाळी 10च्या सुमारास मीनी बसमधून येरवडा खुल्या कारागृहातील 30 कैद्यांना गणपती चौक येथे पोलिस बंदोबस्तात आणले. त्यांना फेटे बांधून ढोल वादनासाठी सज्ज केले. कमरेला बांधलेला ढोल आणि त्यावर "येरवडा खुले कारागृह पुणे' असे लिहिलेले नाव पाहून पुणेकरांची उत्सुकता वाढली. या कैद्यांनी ठेक्‍यामध्ये जबरदस्त ढोल व ताशा वादन सुरू केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबलेल्या भाविकांनी या कैद्यांच्या वादनाला प्रतिसाद दिल्याने त्यांना आणखी उत्साह संचारला. 
नागिरकांकडून मिळणाऱ्या सन्मानामुळे कैदी भारावून गेले. या क्षणांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता. 

लक्ष्मी रस्ता ते अप्पा बळवंत चौक या दरम्यान सुमारे दोन तास कैद्यांनी जोशपूर्ण वादन केले. हा दुर्मिळ क्षण पुणेकारांनी कॅमेऱ्यात फोटो व व्हीडीओ काढून कैद केला. 
कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक, हा देशातील पहिलाच प्रयोग आहे, नादब्रह्मच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने कैदी ढोल वाजविण्यास शिकले. हे कैदी चांगले वादन करत असल्याने हे पथक कायमस्वरूपी असेल. 

तर, कैद्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी धारिष्ठ कारागृह प्रशासनाने दाखवले. त्यामुळे हे शक्‍य झाले, असे मंडळाचे अध्यक्ष ऍड. प्रताप परदेशी यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoners of yerwada Jail enjoyed the Ganesh Festival in Pune