श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर अथर्वशीर्ष पठण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आज स्त्रीशक्तीचा अथर्वशीर्ष पठण व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर आज (शनिवारी) पहाटे पाच वाजता अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

दरवर्षी या कार्यक्रमात हजारो महिला भाविक सहभागी होतात. त्या वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्या दिवशी पहाटे पाचपासून शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. शिवाजी रस्त्यावर जिजामाता चौक ते रामेश्‍वर मंदिर चौकापर्यंत सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली होती. गाडगीळ पुतळा, जिजामाता चौकातून डावीकडे वळून गणेश रस्त्याने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेबाबा चौक, गोटीराम भय्या चौक तेथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात आला होता. 

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आज स्त्रीशक्तीचा अथर्वशीर्ष पठण व महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune news Dagdusheth Halwai Ganpati Mandal