esakal | उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा! बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा! बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा उपक्रम

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे "उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा' हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा! बृहन्मुंबई गणेशोत्सव समितीचा उपक्रम

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय (Office of the Chief Electoral Officer) आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने "उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा' हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा: गौरी सजावटीच्या साहित्यांनी सजल्या बाजारपेठा !

सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेशदेखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय "उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा' हा आहे. मताधिकार हा 18 वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्‍यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पनाराबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे या सारख्या विषयांवर आपल्या सजावटीतून जागृती करता येऊ शकते. यासाठी भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: गौरी-गणपतीकरिता अनारकली, चंद्रकला मोदकांची मोठी रेंज!

स्पर्धेच्या अटी व वैशिष्ट्ये

 • विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत

 • फोटो मूळ स्वरूपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन असे अधिकचे काही जोडू नये

 • प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त 200 केबी साइजचा व जेपीजी फॅरमॅटमध्येच असावा

 • पाचही फोटोंची एकत्रित साइज एक एमबीपेक्षा जास्त असू नये.

 • आपल्या सजावटीची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी 30 सेकंदांची आणि जास्तीत-जास्त एक मिनिटाची पाठवावी

 • चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, मूळ रूपात आहे, त्या स्वरूपात पाठवावी

 • कोणत्याही प्रकारे संपादित (एडिटिंग) करू नये. चित्रिकरण करताना देखाव्याचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल.

 • ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त 100 एमबी असावी. तसेच, ही ध्वनिचित्रफित एमपी 4 फॉरमॅटमध्ये असावी

 • आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/6TXQHaKSAhZmBbQFA या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत

 • ज्या स्पर्धकांना फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी अविराज मराठे ( 7385768328), श्री प्रणव सलगरकर (8669058325) सांना व्हॉट्‌सऍप करून कळवावे

 • 10 सप्टेंबर 2021 ते 19 सप्टेंबर 2021 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

बक्षिसांचे स्वरूप

प्रथम क्रमांक 21 हजार, द्वितीय क्रमांक 11 हजार, तृतीय क्रमांक 5 हजार, उत्तेजनार्थ 1000 रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

loading image
go to top