esakal | गौरीच्या मांडवात ठेवण्यासाठी असे बनवा झटपट चिरोटे
sakal

बोलून बातमी शोधा

गौरीच्या मांडवात ठेवण्यासाठी असे बनवा झटपट चिरोटे

गौरीच्या मांडवात ठेवण्यासाठी असे बनवा झटपट चिरोटे

sakal_logo
By
अर्चना बनगे

गौरीचे आवाहन झाल्यानंतर तीच्या मांडवात अनेक पदार्थ ठेवले जातात.अशावेळी झटपट रेसीपी करायची असेल तर चिरोटे या गोड पदार्थाचा विचार करू शकता. अगदी कमी वेळेत ही रेसीपी होते. ती कशी बनवायची जाणून घेऊया..

साहित्य:

1 किलो मैदा, 1 किलो साखर, तेल, साटा साठी कॉर्न फ्लावर, जिलेबीचा रंग चिमूटभर, वेलची पावडर, पाणी, 1लिंबाचा रस

कृती: 1 किलो मैदा परातीत चाळणीने चाळून घ्या, नंतर त्यात अर्धी वाटी तेल कडकडीत करून मोहन घाला, नंतर थोडे थोडे पाणी घालून, गोळा तयार करून घ्या, हा गोळा 2 तास मुरण्यासाठी झाकून ठेवा..

चिरोटेसाठी असा तयार करा पाक

एका पसरट आणि खोलगट कढईत साखर घाला त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून घ्या, थोडे पाणी वरती असेल तर चालेल. आता हे मिश्रण गॅस वर उकळत ठेवा. चमच्याने साखर पूर्ण विरघळे पर्यंत हलवत राहा. उकली आली की त्याची 1 तार येतेय का ते बघा. बोटावर पाक चिकट लागतोय का बघा. मधा सारखा चिकट लागत असेल आणि 1 तार सुटत असेल तर गॅस बंद करा. त्यात चिमूटभर रंग घाला, 1 लिंबू रस घाला, अर्धा चमचा वेलची पूड घाला.

आता चिरोटे कसे करायचे ते बघूया...

2 तास झाल्या नंतर मुरलेल्या मैद्याचा गोळा परातीत घेवुन तेल घालून पीठ मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्यात वेगवेगळा रंग घालून, 3 रंगात गुलाबी, पिवळा आणि पांढरा असे तीन गोळे तयार झाले की पोळ्या लाटून घ्या. यात 2 पांढऱ्या पोळ्या 1 गुलाबी असे कॉम्बिनेशन करून चिरोटे करा. फुलका साईजच्या पातळ पोळ्या लाटून घ्या. 3 पोळ्या लाटा.(साटा.. डिश मध्ये साधारण 5 चमचे घ्या त्यात कॉन फ्लॉवर घाला, त्याची पेस्ट व्हायला हवी फार घट्ट नाही आणि फार पातळ पण नाही...)

1 पोळी वर साटा लावा वरून परत एक पोळी ठेवा. परत साटा परत पोळी अश्या पद्धतीने करा नंतर त्या पोळीचा रोल करून घ्या. मग सुरीने बोटाचे पेर एवढे कट करून घ्या. ज्या बाजूने कट केले त्यावरून हाताने दाबून घ्या. फार नाही हलक्या हाताने नंतर उभे उभे लाटा म्हणजे तळताना पदर सुटतील.

कढईत तेल घाला..

तेल थोडे जास्त असू द्या म्हणजे चिरोटे तळाशी जावून लाल पडणार नाहीत. तेल कडकडीत झाले की चिरोटे तळायला घ्या. दुसरीकडे आधी पाक त्यावर करून ठेवला होता तो ही गॅसवर गरम करायला ठेवा. वर सांगितले त्या पध्दतीने सर्व चिरोटे करून घ्या. आता तेलात चिरोटे तळुन घ्या. साधारण 6 ते 8 चिरोटे तळुन झाले की पाकात घाला. कढईत तेलात चिरोटेचा 2 रा घाणा टाकून तळुन होईपर्यंत दुसऱ्या कढईत पाकात चिरोटे राहू द्या. चिरोटेचा आधीचा घाणा पापड चिमट्याने पाकातून काढून चाळणी वर जास्तीचा नितरुन घ्या. अश्या पध्दतीने एक एक करून चिरोटे तळावे आणि पाकात टाकावे आणि पाकातून चाळणीवर काढावे.

महत्वाच्या टिप्स...

साटा डिश मध्ये 5 चमचे तेल, 2 चमचे कॉर्न फ्लावर घ्या, त्याची पेस्ट तयार करून घ्या

चिरोटे करायच्या वेळी 3 पोळ्या घेत राहा.

चिरोटेचे रोल कट करून ताटात फ्रिजमध्ये 2 तास ठेवून द्या.

कट केलेली बाजू हलक्या हाताने लाटणे फिरवून घ्या. म्हणजे चिरोटेला छान पदर सुटतात.

जास्त पोळ्याची चळत घेतली तर, चिरोटे ला पदर सुटत नाही..

चिरोटे पाकात जेव्हा टाकतात तेव्हा पाक गरम असावा..

तेल गरम झाल्यावर चिरोटे तेलात घालून त्यावर झाऱ्याने दाबून घ्या, व गॅस मंद करा..

नंतर खरपूस तळुन पाकात टाका..

loading image
go to top