esakal | Ganesh Chaturthi 2021: बाप्पाच्या नैवद्यासाठी बनवा कर्नाटकातील 'हे' खास पदार्थ
sakal

बोलून बातमी शोधा

अवलक्की पायसम

बाप्पाच्या नैवद्यासाठी बनवा कर्नाटकातील 'हे' खास पदार्थ

sakal_logo
By
अर्चना बनगे

गणेश चतुर्थीचा उत्साह आता देशभर सुरु आहे . रोजच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये या १० दिवसात थोडा बदल होतो. आता ठरल्याप्रमाणे वेळेतच आरती करावी लागते. त्यामुळे महिलांची किचनमध्ये धांदल उडतेच. त्यात रोज नैवद्याला वेगळ काय बनवायचं हा मोठा प्रश्न. यावेळी बाप्पाच्या प्रसादाला काही वेगळे ट्राय करायचं असेल तर कर्नाटक रेसीपी करू शकता. कर्नाटकातील विनायक चतुर्थीच्या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. कर्नाटकात बनवलेल्या प्रसादामध्ये विविधता आहे. तसेच हे पौष्टिक देखील असतात.

कर्नाटकात बनवलेले पदार्थ

मुष्टी कडबू

मुष्टी कडबु बनवण्यासाठी गूळ, तांदळाचे पीठ, नारळाची पूड आणि तूप घ्या. भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात गूळ घाला. नंतर नारळाची पूड, तूप घाला आणि नंतर तांदळाचे पीठ घाला. जेव्हा हे मिश्रण शिजेल तेव्हा ते थोडे जाड होते. नंतर गॅस बंद करा. आपण चवीसाठी वेलची पावडर देखील घालू शकता. जेव्हा मिश्रण थंड होईल तेव्हा त्याला मुठीने दाबत बॉल सारखा आकार घ्या. त्यानंतर वाफेवर शिजवा आणि मग तुम्ही बाप्पाला नैवद्य दाखवू शकता.

अवलक्की पायसम

अवल पायसम हा पदार्थ पोहे पासून बनवला जातो. यासाठी खडबडीत पोहे, दूध, नारळाची पूड आणि साखर लागते. सर्वप्रथम पोहे धुवून भिजवा. दूध ढवळत रहा. दूध घट्ट झाल्यावर साखर घाला आणि नारळाची पूड घाला. शेवटी पोहे घाला आणि शिजू द्या.

सोरकाई पायसा

ही डिश बनवण्यासाठी तुम्हाला किसलेला दुधी भोपळा, गूळ, दूध, नारळाची पूड आणि तूप आवश्यक आहे. खासकरून दुधी भोपळ्याचा हलवा बनवला जातो. फरक एवढाच की साखरेऐवजी गूळ घालावा लागतो. पहिल्यांदा दूध घट्ट करावे लागते. नंतर त्यात किसलेला दुधी भोपळा आणि दूध घालून उकळू घ्या. भोपळा शिजल्यावर त्यात गूळ आणि तूप घाला. शेवटी, आपण नारळाची पूड घालू शकता.

टोमॅटो मुरक्कू

तुम्ही अनेक वेळा नमकीन चकली केली असेल. टोमॅटो मुरक्कू त्याच प्रकारे बनवायचे आहे. यासाठी तांदूळ, हरभरा डाळ पीठ एकत्र घ्या. त्यात हिंग, लाल मिरची, मीठ, जिरे पूड, धणे पावडर घाला. आणि टोमॅटो पेस्ट घाला. जर तुम्हाला जास्त आंबट हवे असेल तर लिंबू देखील वापरू शकता. मोहन घालून पीठ मळून घ्या आणि चकलीसारखे बनवा. टोमॅटो मुरक्कू तयार आहे.

रवा पायसा

रवा पायसा म्हणजे रव्याची खीर. रवा भाजून बाजूला ठेवा. दूध गरम करा. त्यात रवा घालून उकळू द्या. रवा मऊ झाल्यावर साखर घाला आणि नारळाची पूड घाला. आपण साखरेऐवजी गूळ देखील घालू शकता, परंतु यामुळे रंग बदलेल. खीर बनवल्यानंतर तुम्ही त्यावर पिस्ता, काजू, बदाम वरून सजवू शकता.

loading image
go to top