esakal | स्वादिष्ट मोदक खायचे, मग 'या' आहेत रेसिपीज्
sakal

बोलून बातमी शोधा

मलाई मोदक

स्वादिष्ट मोदक खायचे, मग 'या' आहेत रेसिपीज्

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. बाप्पांचे आवडते मोदक विविध चवीत उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला मलाई मोदक, मोतीचूर मोदक, तांदळाचे मोदक, नारियल मोदकांच्या रेसिपीविषयी सांगणार आहोत. तर चला (Modak Recipes In Marathi) त्याविषयी जाणून घेऊ या...

मलाई मोदक

साहित्य

- पनीर - ५०० ग्रॅम

- कंडेन्स्ड दुध - १ छोटी वाटी

- पिवळा रंग - १ छोटा चमचा

- केवड्याचे पाणी - ५ थेंब

कृती

- पनीर बारीक करुन घ्या

- पॅन गरम होण्यासाठी गॅसवर ठेवा.

- त्यात पनीर व कंडेंस्ड दुधही टाका. गॅस कमी करुन ते मिक्स करुन घ्या.

- एका मिनिटानंतर त्यात केवड्याचे पाणी टाकून गॅस बंद करा.

- मिश्रण थोडेसे थंड झाल्यानतर त्याचे मोदक तयार करा.

मोतीचूर मोदक

मोतीचूर मोदक

मोतीचूर मोदक

साहित्य

- बेसण - ६५० ग्रॅम, साखर - ६०० ग्रॅम, बेकिंग पावडर - चिमूटभर, बारीक केलेली इलायची - १५, बेदाणे - ५० ग्रॅम, केसर - १/२ ग्रॅम, तळण्यासाठी तूप

कृती

- सर्वप्रथम बेसण आणि बेकिंग पावडर मिक्स करुन घ्या.

- आता त्यात तूप मिक्स करा. त्यानंतर दूध टाकून ढवळून घ्या.

- कढई गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून द्या.

- चाळणीच्या मदतीने बूंदी बनवून घ्या.

- त्यांना सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

- साखर व पाणी एकत्र करुन पाक बनवून घ्या.

- त्यात इलायची आणि लिंबूचा रस एकत्र करुन तापवा.

- तयार बुंदी त्यात टाका आणि चांगल्या प्रकारे एकत्र करा

- थोड थंड झाल्यानंतर मोदक तयार करुन घ्या.

तांदळाचे मोदक

तांदळाचे मोदक

तांदळाचे मोदक

साहित्य

- तांदळाचे पीठ - २५० ग्रॅम

- रवा - ५० ग्रॅम

- साखर - ३०० ग्रॅम

- तूप - १०० ग्रॅम

- दूध - १ वाटी

- बारीक केलेली इलायची - १०

- काजू व इतर सुकेमेवे आवश्यकतेनुसार

कृती

- काजू बारीक करुन घ्या.

- कढईत प्रथम तांदळाचे पीठ, नंतर रवा भाजून घ्या.

- एका मोठ्या वाटीत भाजलेले तांदळाचे पीठ, रवा, बारीक केलेले काजू, इलायची टाकून मिक्स करुन घ्या. मिक्स्चर बनवून घ्या.

- साखरेचा पाक तयार करुन घ्या.

- पाक वरील मिक्स्चरमध्ये टाका

- थोडे थंड झाल्यानंतर पाणी किंवा दूध लावून मोदक तयार करा.

नारळ मोदक

नारळ मोदक

नारळ मोदक

साहित्य

कच्चे नारळ - एक गोटा, मावा - ३५० ग्रॅम, तूप-२ मोठे चमचे, पिठी साखर ३०० ग्रॅम, बारीक केलेली इलायची - १०, चिरौंजी - १५ ग्रॅम, कापलेला पिस्ता व बदाम - २५ ग्रॅम, केसर - ६-७, केवडा पाणी - ५ थेंब

कृती

- सर्वप्रथम कच्चे नारळ बारीक करुन घ्या

- मावा कढईत भाजून घ्या

- जेव्हा मावा पातळ होऊ लागल्यास त्याला गॅसवरुन काढून घ्या.

-आता पुन्हा कढईत तूप टाका आणि बारीक केलेले नारळही भाजून घ्या. त्यातील पाणी जाईपर्यंत भाजा

- त्यात भाजलेला मावा मिक्स करुन घ्या

- त्याबरोबरच केसर, इलायची, साखर, केवड्याचे पाणी, बारीक केलेले सुकामेवा टाका

- आता मोदक बनवा.

loading image
go to top