Mava Modak: कमी साहित्यात, अगदी कमी वेळात आणि झटपट तयार मावा मोदक कसे करायचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mava Modak

Mava Modak: कमी साहित्यात, अगदी कमी वेळात आणि झटपट तयार मावा मोदक कसे करायचे?

Ganpati Bappa: यावर्षी 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे आता अवघ्या काही दिवसांवर हा गणेशोत्सव सण येऊन ठेपला आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. गणपतीसाठी बाप्पाचे आवडते पदार्थ तयार केले जातात. बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक घरोघरी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक तयार केले जातात. मग यावर्षी तुम्ही उकडीचे आणि तळलले मोदक तयार करण्यापेक्षा कमी साहित्यात, अगदी कमी वेळात आणि झटपट तयार होणारे मावा मोदक तयार करुन पाहा.

हे मावा मोदक कसे करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत. हे मोदक बाप्पासाठी नैवेद्य म्हणून आणि प्रसाद म्हणूनही तुम्ही तयार करु शकता.चला तर मग बघू या हे मावा मोदक कसे तयार करायचे याची रेसिपी...

साहित्य:

एक पाव खवा

खाण्याचा पिवळा रंग किंवा केशरचे दूध

125 ग्रॅम पिठी साखरवेलची पूड


कृती:

मावा मोदक तयार करण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये एक पाव खवा घ्यावा.

नंतर तो खवा गॅसवर चार ते पाच मिनिटे भाजून घ्यावा.

खवा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग किंवा केशरचे दूध टाका म्हणजे मोदकला चांगला रंग येईल.

खवा थंड झाल्यानंतर त्यामध्ये 125 ग्रॅम पिठी साखर आणि वेलची पूड टाका.

हे मिश्रण एकजीव करुन घ्या. त्यानंतर मोदकाच्या साच्याच्या सहाय्याने मोदक तयार करुन घ्या. अशा पद्धतीने आपले मावा मोदक झटपट तयार होतील