esakal | बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोड बुंदी | Sweet Bundi for Bappa's Offering
sakal

बोलून बातमी शोधा

Sweet Bundi

बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोड बुंदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाप्पाला नैवद्यामध्ये मोदक, लाडू इत्यादी पदार्थ दाखवले जातात. यात गोड बुंदीसुद्धा असते. जाणून घ्या त्याची रेसिपी.

अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी कमी आचेवर ढवळत रहा. 3 मिनीट (साखर विरघळेपर्यंत) हे मिश्रण शिजवा. हा आपला पाक तयार झाला. पाकाची तार तुटणार नाही याची काळजी घ्या. या पाकात आवडीनुसार वेलची पूड, केशर रंग टाकू शकता. हा पाक बाजूला ठेवा. आता बाउलमध्ये अर्धा कप बेसन, थोडं थोडं पाणी टाकत एक मिश्रण तयार करा. मिश्रण जास्त पातळ किंवा जाडसर राहायला नको. (या मिश्रणाचे सर्वसाधारण प्रमाण - 1 कप बेसन आणि 3/4 कप पाणी) मोहनासाठी 2 लहान चमचे तेल त्यात टाका आणि मिक्स् करा.

आता एका कढईत तेल गरम करुन घ्या. तेल अति गरम करु नका. बुंदीच्या झाऱ्यातून बेसनचे मिश्रण कढईत सोडा. जरा बुंदीचा रंग जास्त गडद न येताच ती बाहेर काढा. (बुंदी लाल होईपर्यंत तळू नका). आधी तयार केलेल्या साखरेच्या पाकात तळलेली बुंदी टाका, मिक्स करा आणि छाकून ठेवा. तासाभराने पुन्हा एकदा बुंदी मिक्स करा आणि छाकून ठेवा. 7 ते 8 तास तसंच राहू द्या. जेणेकरून पाक बुंदीत पुर्णपणे मुरलेला असेल. (ही रेसिपी रात्री करुन दुसऱ्या दिवशी सकाळी बुंदी तयार असेल.) गोड बुंदी तयार.

loading image
go to top