घरात साकारला हुबेहूब ‘उरी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - ‘ये नया इंडिया है, ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी...’ हा संवाद आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातला. या एका वाक्‍याने अनेकांचे रक्त सळसळले. 

कोल्हापूर - ‘ये नया इंडिया है, ये घरमे घुसेगा भी और मारेगा भी...’ हा संवाद आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातला. या एका वाक्‍याने अनेकांचे रक्त सळसळले. 

भारतीय जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच घटनेपासून प्रेरणा घेऊन महाविद्यालयीन युवकाने या चित्रपटावर आधारित देखावा साकारला आहे, तो ही घरामध्ये. येथील मंगळवार पेठ परिसरातील प्रथमेश किरण अतिग्रे या युवकाने स्वतःच्या घरामध्ये ‘उरी’ या चित्रपटाची आरास सजवली आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या अचाट धाडसाचा या कृत्याने प्रत्यकेच्या मनावर छाप सोडली आहे. यातच या युवकाने प्रेरित होऊन हा संपूर्ण प्रसंगच देखावा रूपात मांडला आहे. 

घरगुती गणपतीची आरास सजवावी ही अनेकांची इच्छा असते. त्यातच ती हटके असावी याचेही प्रयत्न केले जातात. अशीच भन्नाट कल्पना आणि भारतीय सेनेने केलेल्या गौरवशाली कामगिरीने प्रेरित होऊन हा देखावा साकारला आहे. 

देखाव्यामध्ये भारतीय सैन्य ज्या पद्धतीने पाकिस्तानमध्ये गेले. ड्रोनचा घेतलेला आधार. या नंतर शत्रूच्या घरात घुसून त्यांच्यावर केलेला हल्ला याची पद्धतशीर मांडणी केली आहे. ज्या पद्धतीने चित्रपटामध्ये या संपूर्ण हल्ल्याचे चित्रीकरण झाले आहे. त्या पद्धतीने या देखाव्यामध्ये परिसर देखील उभा केला आहे.

डोंगराळ परिसर, दऱ्या, खोऱ्यातून वाट काढत जाणारे जवान, हल्ल्यानंतर बाहेर पाडण्यासाठी घेतलेली हेलिकॉप्टरची मदत हे सर्व या ठिकाणी बघायला मिळते. शिवाय देखाव्यासाठी वापरलेले हेलिकॉप्टर, ड्रोन, जवान हे तयार करण्यात आले असून हा पूर्णतः हालता देखावा आहे. या देखाव्यासाठी संपूर्ण अतिग्रे कुटुंबीयांनी एक महिन्याहून अधिक काळ कष्ट 
केले आहे.

दर वर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. एक महिन्याच्या तयारीनंतर हा देखावा साकारला. यामध्ये बाहुल्या, त्यांची कपडे तसेच इतर साहित्य हे घरीच बनवले. सर्व कुटुंबीयांच्या मदतीशिवाय हे बनवणे शक्‍य नव्हते हे नक्की.
- प्रथमेश अतिग्रे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uri in Athigre house Ganesh Festival scene