हडपसरचे विघ्नहर्ता वाद्य पथक : इतिहासाचा ध्यास घेतलेल्या तरुणांचे पथक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

सकाळच्या ऑनलाईन ढोल-ताशा स्पर्धेत पुण्यातली पथके सहभागी झाली आहे. ही पथके केवळ वादनापुरती मर्यादित नाहीत. या पथकांचे सामाजिक कामही मोठे आहे. आपापल्या परीने ही मंडळी विविध सामाजिक कामांत कार्यरत असतात. या सहभागी पथकांची माहिती येथे देत आहोत. सोबत त्यांच्या वादनाच्या फेसबूक पोस्टची लिंकही आहे. आपण या लिंकवर जाऊन या पथकांचे वादन ऐका आणि त्यांना लाईक, शेअर, कॉमेंट करुन दादही द्या....

पुणे : 'विघ्नहर्ता वाद्य पथक 'ध्यास नवा, पर्व नवे, यत्न नवा, स्वप्न नवे... अशा टायटल खाली 2014 च्या नोव्हेंबर महिन्यात सुरवात झाली एका नविन पथकाची. ढोल ताशाची पंढरी समजल्या जाणाऱ्या या पुण्याच्या पूर्व भागात हडपसर मधे हे पर्व सुरू झाले पण 'शेकडोंच्या गर्दीत अजून एक' न राहता या पथकाने एक वेगळीच वाट निवडली होती. इतिहासाची कास धरून स्वताची सांस्कृतिक जडणघडण संपन्न करण्याची.

2014 -15 असा एक वर्षाचा कार्यकाळ संपवून विघ्नहर्ता पथकाने आपल्या जमापूंजीतून 'विघ्नहर्ता ऐतिहासिक ग्रंथालय' उभारण्याचा निर्णय एकमताने घेतला. आज 5 लाखाहून अधिक किंमतीची इतिहासाचे संदर्भग्रंथ वाचनालयात आहेत.) प्रत्येक वादनाच्या ठिकाणी आयॊजकांना  शिवचरित्र भेट देण्याचा अनोखा पायंडा देखिल विघ्नहर्ता परीवाराने पाडला. एका शस्त्रसंग्रहकाच्या मदतीने "कुटुंबवत्सल छत्रपती शिवराय" हे ऐतिहासिक तैलचित्र साकारण्यात पथक नावारूपाला आलं. झुँजार शिलेदार सेवा समिति, आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची, शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन संस्था, दुर्गजागर जागर इतिहासाचा अशा अनेक नामवंत संस्थांचा सन्मान या पथकाने केला. विघ्नहर्ता पथकाचा प्रत्येक वादक या इतिहासाच्या ओढीने भारलेला आहे.  

शिवराय हे शक्तीदाता...! हे मनाशी ठामपणे बाळगत विघ्नहर्ताचे वादक ढोल-ताशांचा ठेका धरत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hadapsar vighnaharta vadya parathak participated in Sakal Dhol Tasha competition