रुबाब वाद्य पथक : शिस्त हाच पथकाचा खरा आधार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रात ढोल ताशाची परंपरा फार पूर्वी पासून सुरु झालेली आहे . अशाच उत्सवातून प्रेरणा घेऊन काही जिगर बाज युवक - युवती एकत्र येऊन 'रुबाब वाद्य पथक ट्रस्ट' १ जुलै २०१८ रोजी स्थापन केले.

महाराष्ट्रात ढोल ताशाची परंपरा फार पूर्वी पासून सुरु झालेली आहे . खास करून पुणे शहर आणि उपनगराजवळच्या गणेशोत्सव, शिवजयंती व इतर अनेक आनंद उत्सवामध्ये ढोल ताशांच्या गजरात कार्यक्रम साजरे होत  असतात. अशाच उत्सवातून प्रेरणा घेऊन काही जिगर बाज युवक - युवती एकत्र येऊन 'रुबाब वाद्य पथक ट्रस्ट' १ जुलै २०१८ रोजी स्थापन केले. 

या पथकामध्ये पुणे शहर आणि परिसरातील ११० युवक - युवतींनी सहभाग घेतला.विशेष म्हणजे पथकामध्ये दोन संपूर्ण कुटुंबाचा सहभाग (आई,वडील,दोन मुले) आहे. पहिल्याच वर्षी पथकाने बीड जिल्हा तसेच महाराष्ट्रा बाहेर जाऊन हैद्राबाद (आंध्र प्रदेश ) येथे वादन केले.
 पथकाने पहिल्याच वर्षी तब्बल २४ ठिकाणी वादन केले आहे. पथकात ६० ढोल, १५ ताशे, २ ध्वज आणि टोल गाडी इत्यादी साहित्यासह  शिस्तबद्धता हा पथकाचा खरा आधार आहे.

सध्या पथक दुसऱ्या वर्षात पदार्पण करीत असताना पथकाने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केवळ ढोल ताशा वाजवून आनंद वाटण्यापेक्षा एखाद्याचे दुःख वाटून घेण्यात माणुसकी आहे हेच रुबाब वाद्य पथकाच्या वादकांना उमजले. त्यातूनच  पुणे - नगर रोड वर चारचाकीच्या धडकेने अपघातात मृत पावलेल्या (संतोष माने व राजेंद्र जाधव ) या दोन युवकांच्या दोन चिमुकल्यांना दत्तक घेतले व त्यांच्या शिक्षणाचा सर्व भार उचलून त्याच्या कुटुंबाला आधार देण्याचे काम पथकाने केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information of Rubab wadya pathak