
रत्नागिरीत गणेशमूर्ती विसर्जनास किनाऱ्यावर 5 जणांनाच प्रवेश
रत्नागिरी : रविवारी अनंत चतुर्दशीला ३३,७१८ आणि सार्वजनिक ४७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन स्थळी केवळ ५ जणांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
गतवर्षीपासून कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर राहिले आहे. यावर्षी कोरोनाची रुग्णसंख्या कमी असल्याने काहीसे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाचा धोका संपलेला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी केवळ पाचच जणांना प्रवेश दिला जाणार आहे. अन्य कोणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याने पाोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात विसर्जना दरम्यान पोलीस बंदाेबस्त ठेवण्यात येणार असून, त्याचे नियाेजन करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी अधिकारी ५६, अंमलदार ४११, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दंगल विरोधी पथक १, शीघ्र कृती दल १, प्रविष्ठ पोलीस उपनिरीक्षक २०, नवप्रविष्ठ अंमलदार १००, होमगार्ड २४१ तैनात ठेवण्यात येणार आहेत.
Web Title: Only 5 People Permission In Ganesh Visarjan 2021 Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..