esakal | तुमचं ढोल पथक लई भारी! दाखवा 'सकाळ'च्या व्हिडिओ ढोल-ताशा स्पर्धेत
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Dhol Tasha Digital competition

या स्पर्धेसाठी आपण एवढेच करायचे आहे...आपल्या पथकाचा सुरेल वादनाचा (शक्‍यतो पथकाच्या गणवेशातला) दहा मिनिटांचा एक व्हिडिओ चांगल्या कॅमेऱ्यावर किंवा हाय-रेझोल्युशन मोबाईलवर शूट करायचा. (मोबाईल आडवा धरून शूट करावे) आणि आमच्याकडे पेनड्राईव्हमध्ये लोड करून किंवा शूट केलेला मोबाईल प्रत्यक्ष आणून २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात पोचवायचा.  

तुमचं ढोल पथक लई भारी! दाखवा 'सकाळ'च्या व्हिडिओ ढोल-ताशा स्पर्धेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. केवळ तरुणाईच नव्हे; तर आबालवृद्धांची पावलं थिरकायला लावणारी ही कला. आपल्या पथकाचाही सराव जोरात सुरू असेल. या वर्षी ढोल-ताशा डिजिटल स्पर्धेच्या रूपाने आपणाला देश-विदेशातील लाखो चाहत्यांच्या थेट घरात पोचण्याची संधी देत आहोत. ‘सकाळ’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा फक्त पुणे शहरात सराव करणाऱ्या पथकांपुरतीच मर्यादित आहे.  

या स्पर्धेसाठी आपण एवढेच करायचे आहे...आपल्या पथकाचा सुरेल वादनाचा (शक्‍यतो पथकाच्या गणवेशातला) दहा मिनिटांचा एक व्हिडिओ चांगल्या कॅमेऱ्यावर किंवा हाय-रेझोल्युशन मोबाईलवर शूट करायचा. (मोबाईल आडवा धरून शूट करावे) आणि आमच्याकडे पेनड्राईव्हमध्ये लोड करून किंवा शूट केलेला मोबाईल प्रत्यक्ष आणून २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात पोचवायचा.  
हे व्हिडिओ २८ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळच्या फेसबुक पेजवर अपलोड केले जातील. वाचकांच्या ज्या व्हिडिओला सर्वात जास्त लाइक्‍स, व्हुवज, शेअर्स आणि कॉमेंट्‌स मिळतील ते पथक विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपयांची पारितोषिके दिली 
जातील. 

स्पर्धेच्या अटी
- व्हिडिओच्या सुरवातीस पथकप्रमुखाने आपल्या पथकाचे नाव व त्या दिवशीची तारीख सांगून मग वादनाला सुरवात करावी. (तारीख नसलेले व्हिडिओ अपलोड केले जाणार नाहीत) 
- वादन 10 मिनिटांचे असावे. त्यापेक्षा जास्त मुदतीचे व्हिडिओ स्पर्धेतून बाद होतील व अपलोड केले जाणार नाहीत. 
- वादन ऐकणे सुसह्य व्हावे, यासाठी चाळीस ढोल व दहा ताशे यांची मर्यादा असावी. (झांज-टिपरी-ध्वज यांच्या संख्येला मर्यादा राहणार नाही)  
- ही स्पर्धा केवळ पुणे शहरात सराव करणाऱ्या पथकांसाठीच मर्यादित आहे  - २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहानंतर आलेले व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत.  
- २८ ऑगस्ट रोजी सकाळी हे सर्व व्हिडिओ वाचकांच्या परीक्षणासाठी अपलोड केले जातील. त्यानंतरच्या ४८ तासांत ज्या पथकांचे व्हिडिओ लाइक्‍स, व्हुवज, शेअर्स आणि कॉमेंट्‌स या निकषांत अव्वल ठरतील, अशा पथकांतून पहिले तीन क्रमांक काढले जातील.

अधिक माहितीसाठी संपर्क
मो. ९८८१०९९००५, ९७६५३१८२८७

loading image
go to top