esakal | गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

mistree14.jpg

गणरायाच्या स्वागताची लगबग सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


पुणे ः गणेशोत्सवाला अवघे दहा दिवस उरले असल्याने सगळीकडे गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र 
खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाकडून मांडव उभारणीच्या परवानगीबाबत उदासीनता दिसून येत असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

खडकीतील अनेक मंडळांची गणेश आगमनाची तयारी सुरू आहे. येथील नवा बाजार गणेश मंडळाच्या देखाव्याचे काम पूर्ण झाले असून, ते येत्या पाच-सहा दिवसांत मांडवाच्या ठिकाणी लावण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सतीश अगरवाल यांनी दिली. दरम्यान, सध्या मूर्तीच्या रंगरंगोटीचे काम सुरू असून, येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याचे कलाकार अनिरुद्ध मुखेडकर यांनी सांगितले. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड उदासीन असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मंडळाकडून मांडव बांधण्यासाठी मागण्यात आलेल्या अर्जाला बोर्डाने अद्याप परवानगी दिली नसल्याने अनेक मंडळांचे देखाव्याचे काम खोळंबल्याचे चित्र आहे. तसेच, पोलिसांकडे देण्यात आलेल्या ऑनलाइन परवाना अर्जाबाबतही कोणतीच माहिती मिळाली नसल्याने मंडळाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. मांडव घालण्याची परवानगी लवकर मिळाली असती तर उत्सवाचे पुढील नियोजन करता आले असते, असे गणेश मंडळांकडून बोलले जात आहे. 
दरम्यान, शिवाजीनगर, वाकडेवाडी, मुळा रस्ता या भागात अनेक मंडळांचे गुरुवारी मंडप बांधून तयार होते. 
 

loading image
go to top