Bizouli Holi: रंग विसरा, इथे चालतात शस्त्रे! अणकुचीदार हत्यारांनी टोचून घेतात शरीर; ५०० वर्षांची ही परंपरा पाहून उडेल तुमची झोप
Uttar Pradesh Tradition: मेरठमधील बिजौली गावात ५०० वर्षांची अनोखी होळी ‘तख्त यात्रा’ साजरी केली जाते. अणकुचीदार लोखंडी शस्त्रे शरीरातून टोचून पार केल्याने उत्साह आणि श्रद्धा निर्माण होते.
गुलाल आणि रंगांची उधळण असलेली होळी तुम्ही पाहिली असेल, पण उत्तर प्रदेशात एका ठिकाणी अशी होळी खेळली जाते जिथे रंग नाही तर अणकुचीदार शस्त्रे चालतात. मेरठमधील बिजौली गावात ही थरारक परंपरा गेल्या ५०० वर्षांपासून जोपासली जात आहे.