Pune Police Dance in Ganesh Visarjan Mirvanuk 2022 : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहाने पार पडली. तब्बल ३० तास हा विसर्जन सोहळा चालला. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यात पोलिसांनी महत्वाची भूमिका पार पाडली. यावेळी ३० तासांची ड्युटी केल्यानंतर शेतवच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील गांजवे चौकात कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनीही नाचण्याचा आनंद घेतला.
Dagdusheth Ganpati Visarjan : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं.पुण्यातील प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी गणपतींपैकी एक आहे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा. पुणे महापालिकेच्या कृत्रिम हौदात गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.पांचाळेश्वर मंदिराच्या समोर हा हौद तयार करण्यात आला होता.
Dagdusheth Ganpati Visarjan : शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. चार तासानंतर मिरवणुकीचा रथ अलका चौकात आला. यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा 'स्वानंदेश' हा विसर्जन मिरवणूक रथ आहे. विद्युत रोषणाईने नटलेल्या रथावरुन दगडूशेठच्या बाप्पाची मिरवणूक निघाली. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली.ठिकठिकाणी पुणेकरांनी या रथाचे स्वागत केले.
Ganesh Visarjan Live | Ganesh Visarjan 2022 | बाप्पा चालले गावाला... मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांचं Live प्रक्षेपण गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...
पुण्यातली विसर्जन मिरवणुक यंदा चांगलीच लांबली. दरवर्षी रात्री १२ च्या सुमारास रथात विराजमान होणारा दगडूशेठ हलवाई गणपती यंदा दुसऱ्या दिवशी पहाटे (शनिवारी) रथात विराजमान झाला.
गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी स्थापना करण्यात आलेल्या श्री गणरायाला निरोप देण्यात आला.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्
पुण्यातल्या गणेशोत्सवाला शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी उशीरा मानाच्या गणपतींच विसर्जन झालं. दरवर्षीपेक्षा अधिक काळ चालली विसर्जन मिरवणूक
पुण्यातील विजय राजेमाने हे हुबेहुब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसतात. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनी यंदा त्यांना आरतीसाठी बोलावले होते. विजय राजेमाने यांनी सकाळ ऑफिसला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले.
पुण्यातल्या गणेशोत्सवाला शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी उशीरा मानाच्या गणपतींच विसर्जन झालं. मानाच्या पाचव्या तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी उशीरा विसर्जन झालं.
पुण्यातल्या गणेशोत्सवाला शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. संध्याकाळी उशीरा मानाच्या गणपतींच विसर्जन झालं. मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी उशीरा विसर्जन झालं.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गणपतीचं विसर्जन झालं.मुलासह जयंत पाटलांनी गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप दिला.जयंत पाटलांसोबत त्यांचा मुलगा प्रतीक पाटीलही उपस्थित होता.
पुण्याचा मानाचा दुसरा गणपती आहे श्री तांबडी जोगेश्वरी गणपती .पाच वाजून ३६ मिनिटांनी तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचं विसर्जन झालं.विसर्जनाआधी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन
नाशकात शंकर, हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी केलेला डान्स मिरवणुकीचा आकर्षण ठरला.वेशभूषा केलेले शंकर आणि हनुमान पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केलेली दिसली. शंकराचं तांडव सादर करण्याची माजी महापौर विनायक पांडे यांची संकल्पना होती. नागा साधूंच्या वेशभूषेतील कलाकारांच्
गणपती विसर्जन मिरवणुकीत शंकर, हनुमान बनून कलाकारांची नृत्यातून मानवंदना
कोरोनानंतर पुन्हा गणेशोत्सव उत्सवात साजरा होतोय. सकाळी १० वाजता पुण्यातील मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मिरवणुकीत हनुमान सगळ्यांचे आकर्षण ठरले होते. हनुमानाची भूमिका करणाऱ्या कलाकाराशी खास संवाद
पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरुन मिरवणुक निघाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं संध्याकाळी ४.१८ मिनिटांनी विसर्जन झालं.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरुन मिरवणुक निघाली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं संध्याकाळी ४.१८ मिनिटांनी विसर्जन झालं.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.