अमेरिकेत जाण्यासाठी चक्क तो झाला म्हातारा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 September 2019

 नवी दिल्ली: मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे एका तरुणाचे स्वप्न भंगले आहे. या तरुणाने चक्क अमेरिकेला जाण्यासाठी 81 वर्षीय म्हाताऱ्याचा वेश परिधान केला होता; परंतु दिल्ली विमानतळावर त्याचे हे नाटक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला ताब्यात घेतले. 

 नवी दिल्ली: मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचे एका तरुणाचे स्वप्न भंगले आहे. या तरुणाने चक्क अमेरिकेला जाण्यासाठी 81 वर्षीय म्हाताऱ्याचा वेश परिधान केला होता; परंतु दिल्ली विमानतळावर त्याचे हे नाटक सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने, त्यांनी त्याला ताब्यात घेतले. 

अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय जयेश पटेल या तरुणाला अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली. तिथे त्याला मोठा पगार देण्यात येणार होता; परंतु त्याचा आतापर्यंतचा इतिहास पाहता, त्याला अमेरिकेचा व्हिसा मिळणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्याने 81 वर्षीय वृद्ध व्यक्ती असल्याचे नाटक उभे केले. त्याने स्वतःचे नाव अमेरिक सिंग असे ठेवले. वयोवृद्ध वाटावा म्हणून त्याने दाढी पांढरी करून घेतली. वयोवृद्धासारखा पोषाख आणि चष्मा घातला. विशेष म्हणजे तो व्हिलचेअरवर फिरायला लागला. 

जयेश पटेल या पोषाखात व्हिलचेअरवर रविवारी (ता. 15) इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावर दाखल झाला. अमेरिक सिंग या बनावट नावाचा पासपोर्ट आणि व्हिजा मिळवण्यात तो यशस्वी झाला होता. अमेरिकेत स्थलांतराच्या त्याच्या सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण होणार असताना त्याने वटवलेल्या धनादेशामुळे त्याची मूळ ओळख सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आली. त्याच वेळी सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, त्याचा आवाज 81 वर्षांच्या म्हाताऱ्यासारखा मिळताजुळता नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर तशा सुरकुत्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना शंका आली होती. 

जयेशने एका एजंटला बनावट पासपोर्ट व कागदपत्र तयार करण्याचे आणि अमेरिकेत पोहचण्यासाठी 30 लाख रुपये दिले होते. तसेच दिल्लीतील एका कलाकाराकडून वृद्धासारखा मेकअप करण्यात आला होता; परंतु सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे या तरुणाच्या अमेरिकावारीचे स्वप्न भंगले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man caught posing as senior citizen to fly america