डुडलद्वारे मुकेश यांना गुगलची आदरांजली

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

मुंबई - आपल्या आवाज देऊन चित्रपटसृष्टीतील गीते अजरामर करणारे पार्श्‍वगायक मुकेश यांच्या जयंतीनिमित्त "गुगल‘ने विशेष "डुडल‘ तयार करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.

‘गुगल‘ने त्यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त सादर केलेल्या डुडलमध्ये "गुगल‘ या नावासह मुकेश यांच्या रेखाचित्राचा समावेश आहे. "कभी कभी मेरे दिल मे‘ या गीताच्या आधारे हे "डुडल‘ बनविण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे.

मुकेश यांनी गायलेले "जीना यहॉं मरना यहॉं‘ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मुकेश चंद माथुर असं त्यांचे पूर्ण नाव असून ते मुकेश या नावाने लोकप्रिय ठरले. राजधानी दिल्लीत 22 जुलै 1923 रोजी त्यांचा जन्म झाला. तर वयाच्या 53 व्या वर्षी 27 ऑगस्ट 1976 रोजी त्यांचे निधन झाले. 1940 पासून ते 1976 पर्यंत ते चित्रपटसृष्टीय सक्रिय होते. मुकेश यांच्या मोतीलाल नावाच्या एका दूरच्या नातेवाईकांनी त्यांच्यातील कलेला ओळखलं. एका विवाहसमारंभात मुकेश यांनी गायलेलं गीत मोतीलाल यांना भावलं आणि त्यांनी मुंबईतील पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे संगीतशिक्षणासाठी पाठवलं. 1941 सालीच त्यांनी "निर्दोष‘ चित्रपटात अभिनेता-गायक म्हणून भूमिका केली. मात्र 1945 साली "पहली नजर‘ या चित्रपटातून ते प्रकाशझोतात आले आणि त्यांना लोकप्रियता मिळाली.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google's tribute to Mukesh doodle