प्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

ऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला. 38 वर्षीय जेंटर या न्यूझिलंडमधील ग्रीन पार्टीच्या सदस्य असून त्या देशाच्या आरोग्य आणि वाहतूक मंत्री आहेत. रविवारी इन्स्टाग्रामवर त्यांनी काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रविवारच्या सुंदर सकाळमुळे, हॉस्पिटलपर्यंत सायकलिंग करत जाण्याची प्रेरणा मिळाली. आणि हे बाळ मिळाले."

जेंटर म्हणाल्या, मी आणि माझे पती पीटर नन्स, ऑकलँड सिटी हॉस्पिटला सायकल वरून गेलो कारण, तिथे अधिकारी सोडून इतरांच्या गाड्यांसाठी पुरेशी जागा नव्हती. पण त्यांनी माझे मन चांगले ठेवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले."

जेंटर या 42 आठवड्यांच्या गरोदर होत्या. त्यांनी आपली प्रसुती आपल्या घरीच आणि नैसर्गिक व्हावी यासाठीचे नियोजन केले होते. जेंटर या दुसऱ्या अशा मंत्री आहेत ज्यांनी बाळाला जन्म दिला. या आधी न्यूझिलंडच्या पंतप्रधान जॉकिंडा अर्डेन यांनी जून महिन्यात त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला होता. जेंटर या तिसऱ्यांदा गरोदर राहिल्या होत्या. याआधी दोन वेळा त्यांचा गर्भपात झाला होता. 

पुढील तीन महिने संसदीय कामकाजांना सुट्टी घेण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. परंतु, मंत्री मंडळाच्या भूमिकेसाठी केवळ सहा आठवड्यांचीच सुट्टी त्या घेणार आहेत. त्यानंतर नन्स हे पूर्णवेळ बाळाची काळजी घेणार आहेत.

जेंटर यांच्या अनुपस्थितीत ग्रीन पार्टीचे जेम्स शॉ हे वाहतूक आणि आरोग्य विभागाचा कारभार सांभाळणार आहेत. यानंतर शॉ हवामानातील बदल मंत्री, सांख्यिकी मंत्री आणि सहकारी वित्तमंत्र्यांच्या भूमिकेत असतील. दरम्यान, युजीनी सेज महिलांसाठी कार्यमंत्री म्हणून काम पाहतील.

ग्रीन पार्टीच्या परिषदेत शॉ म्हणाले, जेंटर यांनी प्रसुतीसाठी सायकलवर हॉस्पिटलमध्ये जाऊन एक मोठा ब्रॅन्ड तयार केला आहे. आम्हाला याचा खुप आनंद होतो आहे, आमच्या दुसऱ्या महिला मंत्र्यांना मुल झाले. देशाच्या कार्यकारी मंडळाच्या दोन सदस्यांना त्यांच्या कार्यकाळत मुलं झाली. त्या एकाच वेळी दोन्ही भूमिका बजवण्यात सक्षम आहेत. अशा देशात राहण्याचा फार अभिमान वाटतो. ही अतिशय आनंददायी बातमी आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister for Women cycles to hospital to give birth