esakal | लिहा, आठवणींच्या कप्प्यातील शिक्षकाबद्दल!
sakal

बोलून बातमी शोधा

लिहा, आठवणींच्या कप्प्यातील शिक्षकाबद्दल!

लिहा, आठवणींच्या कप्प्यातील शिक्षकाबद्दल!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यातील तिसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक. सर किंवा बाई. वर्गातील चार भिंतीच्या आत सर साऱ्या जगाची सफर घडवत असतात. जगाचा इतिहास, जगाचा भूगोल, जगाचे विज्ञान सारं सारं आपले शिक्षक शिकवत असतात. शाळेत आईसारखा लाड करणारे प्रेमळ सर. चूक झाली तर "हिटलर‘प्रमाणे छडी मारणारे मास्तरडे. होमवर्क पूर्ण केल्यावर इतरांना आपले उदाहरण देणाऱ्या बाई. रिकाम्या तासात खेळायला सोडणाऱ्या लाडक्‍या बाई. परीक्षेच्या काळात एकदम कडक वागणारे सर किंवा बाई. छान छान बोधकथा सांगणारे शिक्षक. अशा वेगवेगळ्या रूपात आपल्या सरांनी किंवा बाईंनी आपल्या आठवणींच्या कप्प्यात आदराचे स्थान मिळविलेले असते. अगदी कधीच न विसरता येण्यासारखे....