James Bond actress Honor Blackman dies at 94 of natural causes
James Bond actress Honor Blackman dies at 94 of natural causes

जेम्स बॉण्ड सीरिजमधील बॉण्डगर्ल ऑनर ब्लॅकमॅन यांनी घेतला जगाचा निरोप

Published on

नवी दिल्ली : हॉलिवूडमधील लोकप्रिय जेम्स बॉण्ड सीरिजमधील बॉण्डगर्ल ऑनर ब्लॅकमॅन यांनी घेतला जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. हॉलिवूडमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेवर आधारित अनेक चित्रपट आणि सीरिजची निर्मिती करण्यात आली. या सीरिजमधील जेम्स बॉण्ड हे पात्र जसं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतं. त्याचप्रमाणे यातील बॉण्डगर्लची देखील चाहत्यांमध्ये क्रेझ होती.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॉण्डगर्लच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. जेम्स बॉण्ड सीरिजमधील गोल्डफिंगर यातील बॉण्ड गर्ल अभिनेत्री ऑनर ब्लॅकमॅन हिचं आज निधन झाले आहे. त्यांचे निधन वृद्धापकाळामुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. ऑनर यांच्या निधनाची माहिती समजात त्यांच्या जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. याबाबतचे ट्विट जेम्स बॉण्ड या ट्विचर अकाउंटवरूनही करण्यात आले आहे.


दरम्यान, ऑनर या केवळ उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर एक कर्तव्यदक्ष गृहिणीदेखील होती. त्यांनी करिअरबरोबरच घरही उत्तमरित्या सांभाळलं. त्या एक चांगली आई, आजी होत्या. त्यांच्या आवाजात एक गोडवा होता. त्यांच्या आठवणी कायम आमच्यासोबत असतील, असं ऑनर यांच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले. त्यांच्या निधनानंतर अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऑनर यांनी अनेक चित्रपट, छोट्या पडद्यावरील शोमध्ये काम केलं आहे. जेम्स बॉण्डप्रमाणेच त्यांची द अव्हेंजर शो मधील त्यांची भूमिकाही खूप गाजली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com