जेनिफर एनिस्टनची इन्स्टाग्रामवर एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

अभिनेत्री जेनिफर एनिस्टनचा इंन्स्टाग्राम डेब्यू सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

हॉलीवुड टीव्ही सीरीज फ्रेंड्सच्या प्रचंड यशामुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री जेनिफर एनिस्टनचा इंन्स्टाग्राम डेब्यू सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

सोशल मीडियापासून दूर असलेली अभिनेत्री जेनिफर ने इन्स्टाग्रामवर पहिला फोटो पोस्ट केला तर, त्याला चाहत्यांचा एवढा तुफान प्रतिसाद मिळाला की, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ विश्र्व रेकॉर्ड ने नोंद घेतली आहे. 

जेनिफर याआधी तिच्या दुसऱ्या मित्र मैत्रीणींच्या सोशल मीडियावरील साईटवर दिसत असे. जेनिफरने तिचा फोटो पोस्ट करताच पाच तासात 10 लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला. याची गिनीज बुक ऑफ ऑफ विश्र्व रेकॉर्ड ने नोंद घेतली आहे. या आधी हा रेकॉर्ड प्रिंस हैरी आणि त्याची पत्नी मेगन मार्केल यांच्या नावावर होता. त्यांना 5 तास 45 मिनीटांनी 10 लाख फॉलोअर्स
झाले होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jenifer aniston breaks the guinness book of world record just by instagram debut