esakal | स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या संगणकाचा होणार लिलाव
sakal

बोलून बातमी शोधा

steve jobs and and Steve Wozniak made apple 1 computer fetch

स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या संगणकाचा होणार लिलाव

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सॅन फ्रान्सिस्कोः अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांनी 1970च्या दशकात बनविलेल्या दुर्मिळ संगणकाचा 25 सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे. यावेळी कोट्यवधीची बोली लागण्याची शक्यता आहे.

स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांनी तयार केलेला संगणक अद्यापही कार्यरत आहे. लिलावामध्ये या संगणकाला सुमारे 3 लाख डॉलर एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

1970 साली स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनिक यांनी अॅपल 1 हा डेस्कटॉप संगणक तयार केला होता. या संगणकाचा लिलाव बोस्टनमधील आरआर ऑक्शनकडून आजोजित करण्यात येणार आहे. अॅपल 1 हा संगणक त्या खास 60 संगणकांपैकी आहे, जे आजही अस्तित्वात आहेत. अॅपल 1 संगणकाला अॅपल I किंवा अॅपल-1 या नावानेही ओळखले जाते. अॅपलने 1976 साली तो बाजारात आणला होता.

लिलावामध्ये मदरबोर्ड, मेन्युअल, पीरियड स्टाइल मॉनिटर आणि कीबोर्ड यांचाही समावेश असणार आहे. 1976 साली संगणक किती शक्तिशाली होता, हे यामाध्यमातून दाखवण्यात येईल. अॅपल 1 एक्स्पर्टस् कोरी कोहेन यांनी 2018 मध्ये या संगणकाला रिस्टोअर केले होते. तसेच त्यांनी त्याला 10 पैकी 8.5 एवढे रेटिंग दिले होते, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

loading image