3 parent technique
3 parent technique

तीन डीएनए वापरुन बाळाचा जन्म

मेक्सिको (अमेरिका) - आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि असलेल्या तणावाचा परिणाम म्हणून अनेक जोडप्यांना आई-बाबा होण्याचा आनंद मिळविण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे, या क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, त्यात नवनवीन संशोधनही केले जात आहे. ‘न्यू सायन्टीस्ट‘ या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, तीन जणांच्या डीएनएचा वापर करुन बाळाला जन्म देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

यामध्ये आई, वडील व एक माता डोनरच्या डिएनएचा वापर करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे आईच्या गुणसुत्रांमध्ये असलेले दोष बाळामध्ये आले नसून, हे बाळ निरोगी जन्माला आले आहे. 

या बाळाचे पालक जॉर्डन येथील रहिवासी असून, बाळाच्या आईला लेह सिंड्रोम (Leigh syndrome) होता. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये माईटोकॉन्ड्रिया (mitochondria) भाग असतो. ज्याचे काम पेशींना उर्जा देणे हे असते. ज्याला पेशींचे पॉवर हाऊस असेही म्हटले जाते. परंतु यामध्ये दोष असल्यास ही अनुवंशिकता बाळातही येते. त्यालाच लेह सिंड्रोम असे म्हणतात. यामुळे या दाम्पत्याला चार गर्भपात आणि दोन बाळांच्या मृत्यूला सामोरे जावे लागले होते.

तीन जणांच्या डिएनएचा वापर करुन बाळाला जन्म देता येऊ शकतो. यावर 90च्या दशकाच्या अखेरीस संशोधन सुरु झाले. त्याचा आधार घेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन या बाळाला जन्म देण्यात आला आहे. यावर पुढील संशोधन करण्यात येणार असून, याचा फायदा अनेक दांपत्यांना होणार आहे. परंतु, माइटोकॉन्ड्रियल डोनेशनच्या या तंत्रज्ञानाचा आणखी सखोल आभ्यास होण्याची गरज असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com