
वर्णभेदाच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. मात्र, ब्रिटन हा नेहमी उदारमतवादी आणि सहिष्णु देश राहिला आहे. नेहमी काही लोकांचा एक गट असतो जो पूर्वग्रह युक्त असतो. मुलत: तो वर्णवादी असतो.
लंडन- भारतीय वंशाचे ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी वर्णभेदाच्या मुद्द्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे. लहानपणी मलाही वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. मात्र, आता देशाने खूप प्रगती केली आहे, असं ते म्हणाले आहेत. सुनक यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असून ते सध्या ब्रिटनचे वित्तमंत्री आहेत. लंडनमध्ये गेल्या आठवडण्यात वर्णभेदाविरोधात आंदोलन झाले होते. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी सुनक यांना यावर प्रतिक्रिया देण्यात सांगितले होते. ब्रिटनमध्ये लहानाचा मोठा होत असताना मला वर्णभेदाचा अनुभव आला आहे. खासकरुन जेव्हा माझे लहान भाऊ-बहीण सोबत असायचे त्यावेळी अधिक वाईट वाटायचं, असं ते म्हणाले आहेत. ते स्काई न्यूजशी बोलत होते.
कोरोना वॅक्सिनसंदर्भात चिनी कंपनीने दिली गूड न्यूज!
वर्णभेदाच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. मात्र, ब्रिटन हा नेहमी उदारमतवादी आणि सहिष्णु देश राहिला आहे. नेहमी काही लोकांचा एक गट असतो जो पूर्वग्रह युक्त असतो. मुलत: तो वर्णवादी असतो. जेव्हा माझे आजी-आजोबा या देशात आले होते, मी लहानाचा मोठा होत होतो, तेव्हापासून आपल्या समाजाने आणि देशाने खूप प्रगती केली आहे, असं ते म्हणाले आहेत. काही शब्द साधे वाटतात. पण हे शब्द असे टोचतात, जसे दुसरी कोणतीही गोष्ट टोचत नाही. वर्णभेदाचे शब्द जेव्हा तुमच्या कानावर पडतात तेव्हा तुमच्या ह्रद्याला हजारो छिद्र पडत असल्याचा अनुभव येत असल्याचं सुनक म्हणाले.
चीन पाठोपाठ नेपाळचे फुत्कार, भारताची जमीन दाखवली आपल्या नकाशावर
लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यावर सुनक यांनी भाष्य केलं आहे. हिंसाचाराची घटना स्तब्ध करणारी आणि तिरस्कार वाटण्यासारखी आहे. जे लोक याप्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, कृष्णवर्णीय अमेरिकेन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा पोलीस कारवाईत झालेल्या मृत्यूमुळे वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशातील नागरिक वर्णभेदाविरोधात रस्त्यावर उतरुन निदर्शनं करत आहेत.