अमेरिकेत बेछूट गोळीबार; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 22 February 2021

अमेरिकेच्या मिसौरी राज्याच्या अमेरिकन लीजन क्लबमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या मिसौरी राज्याच्या अमेरिकन लीजन क्लबमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शिवाय 4 जण जखमी झाले आहे. मिसौरी पोलिसांनी याची माहिती दिली आहे. केएआयटी-टीव्हीच्या रिपोर्टनुसार, रविवारी रात्री जवळपास 12 च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर केनेटमध्ये अमेरिकन लीडन इमारतीत अधिकाऱ्यांना 5 व्यक्ती आढळले. 

इमारतीत आढललेल्या व्यक्तींपैकी दोघांची स्थिती गंभीर होती. त्यांना मिसौरीच्या केप गिरार्डो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अन्य दोन जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सध्यातरी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेरले असून शोध मोहीम सुरु आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 dead 4 injured shooting American Legion in Missouri