खरा 'जेम्स बॉन्ड' सापडला? कधी? कुठं?

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 23 October 2020

जेम्स बॉन्ड नावाचा एक एजेंट लंडनच्या गुप्तचर विभागात खरंच काम करायचा हे सांगितल्याच तुम्हाला खरं वाटेल का? 

लंडन- सध्या एका बातमीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. जेम्स बॉन्ड नावाच्या ब्रिटनच्या एजेंटला तुम्ही पडद्यावर पाहिलं असेल. कोणत्याही मिशनला यशस्वीरित्या पूर्ण करणारा जेम्स बॉन्ड म्हणजेच 007 ने अनेकांच्या मनात घर केले असेल. पण, जेम्स बॉन्ड नावाचा एक एजेंट लंडनच्या गुप्तचर विभागात खरंच काम करायचा हे सांगितल्याच तुम्हाला खरं वाटेल का? 

इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल रिमेम्बर्न्स the Institute of National Remembrance (IPN)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे लोकांसोबतच गुप्तचर समुदायाला हादरवून सोडलं आहे. जेम्स बॉन्ड नावाचा ब्रिटनचा एक एजेंट कोल्ड वॉरदरम्यान पोलंडमध्ये आला होता, असा खुलासा कागदपत्रांमधून करण्यात आला आहे. 

18 फेब्रुवारी 1964 मध्ये जेम्स बॉन्ड नावाचा ब्रिटिश एजेंट वरशॉ येथे आला होता. कोल्ड वॉरदरम्यान पोलंडमधील या जागेला विशेष महत्व होते. जेम्स बॉन्ड अधिकारिकरित्या ब्रिटिश दुतावासाचा लेखागार म्हणून रुजू झाला होता. पण, लवकरच तो पोलिश गुप्तचर अधिकाऱ्यांच्या नजरेला आला. एका ठिकाणी, तो सोवियत बॉर्डरजवळ हेरगिरी करताना आढलला होता. 

जेम्स बॉन्डने लष्करासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी वारंवार उत्तर पोलंडला भेट दिली असल्याचे कागदपत्रात सांगण्यात आले आहे. या इन्स्टिट्यूटचे संचालक मार्झेना क्रुक यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की, ''तो एक हेर होता आणि पोलंडमध्ये तो हेरगिरीचे काम करायचा.'' 

ब्रिटिश गुप्तचर विभाग जो MI6 नावानेही ओळाखला जातो, या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. पण, इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, जेम्स बॉन्ड नावाचा एक एजेंट पोलंडमध्ये कार्यरत होता. 

जेम्स बॉन्ड नावाचा पहिला चित्रपट 1962 मध्ये पहिल्यांदा रिलिझ झाला होता. लेखक इल्यान फ्लेमिंग यांचे जेम्स बॉन्ड हे एक काल्पनिक पात्र fictional character आहे.  1962 मध्ये जेम्स बॉन्ड सिरिजमधला “Dr. No ” नावाचा पहिला चित्रपट आला होता. त्यामधे 007 ची भूमिका सीन कॉनरी यांनी निभावली होती. आतापर्यंत बॉन्ड सिरिजचे 26 चित्रपट रिलिज झाले आहेत. यात वेगवेगळ्या 7 कलाकारांनी बॉन्डची भूमिका केली आहे. दरम्यान, चित्रपटांमधून अनेकांवर भूरळ घालणाऱ्या जेम्स बॉन्डचे पात्र खऱ्या आयुष्यातील बॉन्ड कडून प्रेरित आहे का, अशी चर्चा होऊ लागली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Real James Bond Declassified files suggest a Cold War spy by that name