रक्तरंजित संघर्ष | 10 जणांचे मृतदेह... आणि तेही पुलावर लटकवलेले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mathura : Man gunned down trying to protect sisters from goons

रक्तरंजित संघर्ष | 10 जणांचे मृतदेह... आणि तेही पुलावर लटकवलेले!

मेक्सिकोच्या जकाटेकस राज्यातील अधिकाऱ्यांना गुरुवारी 10 मृतदेह सापडले. महत्वाचं म्हणजे त्यापैकी नऊ मृतदेह एका पुलावर लटकलेले होते. या भागावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी ड्रग्ज टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. मेक्सिको सिटीच्या उत्तरेकडील भागात मृतदेह सापडल्याचं जॅकटेकसच्या राज्य सार्वजनिक सुरक्षा संस्थेने सांगितलं. यासाठी त्यांनी निवेदन जारी केल्याची माहिती टीव्ही 18 ने दिली आहे. मृतांमध्ये सर्वजण पुरुष असून या घटनेचा संबंध रक्तरंजित संघर्षाशी आहे,असं पोलिसांनी सांगितलं.

सिनालोआ आणि जॅलिस्को न्यू जनरेशनच्या टोळ्यांमध्ये अमली पदार्थांच्या तस्करीसाठी महत्त्वाचे राज्य असलेल्या या भागावर कब्जा करण्यासाठी रक्तरंजित लढाया झाल्या. फेडरलच्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत मेक्सिकोमध्ये 25,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत.

अशीच घटना आठवडाभरापूर्वी देखील घडली होती. मेक्सिकोच्या मिचोआकान राज्यात पोलिसांना गोळ्यांनी छिन्नविछिन्न 11 जणांचे मृतदेह सापडले. ही घटना अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्षाशी संबंधित असल्याचेही बोलले जात होते.

सरकारी वकिलांनी सांगितले की हे मृतदेह मिचोआकानच्या उत्तरेकडील तारेक्विएटो शहराजवळ सापडले आहेत. तपास करणार्‍यांना अद्याप मृतांची ओळख पटवता आलेली नाही. मात्र, त्याला घटनास्थळी एक ट्रक आणि तीन मोटारसायकली सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हा भाग जलिस्को राज्याला लागून आहे. जॅलिस्कोमध्ये, त्याच नावाची एक ड्रग स्मगलिंग टोळी आहे, जी मिचोआकन राज्यात आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करते आणि मिचोआकनमधील स्थानिक गटांशी संघर्ष करत आहे.

loading image
go to top