esakal | Coronavirus : जगातील बाधितांची संख्या दहा लाखांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus

जगाभोवतीचा कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट झाला असून आज जगभरातील बाधितांची संख्या साडेदहा लाखांवर पोचली. या संसर्गाने आतापर्यंत ५५ हजारांपेक्षाही अधिक लोकांचे प्राण घेतले आहेत. अमेरिका, स्पेन आणि ब्रिटन या देशांना या साथरोगाचा जबर तडाखा बसला आहे. सध्या जगातील अनेक देशांत तपासणीची यंत्रणा आणि किट उपलब्ध नसल्याने ही संख्या उघड झालेल्या आकड्यांपेक्षा अधिक असू शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Coronavirus : जगातील बाधितांची संख्या दहा लाखांवर

sakal_logo
By
पीटीआय

न्यूयॉर्क - जगाभोवतीचा कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट झाला असून आज जगभरातील बाधितांची संख्या साडेदहा लाखांवर पोचली. या संसर्गाने आतापर्यंत ५५ हजारांपेक्षाही अधिक लोकांचे प्राण घेतले आहेत. अमेरिका, स्पेन आणि ब्रिटन या देशांना या साथरोगाचा जबर तडाखा बसला आहे. सध्या जगातील अनेक देशांत तपासणीची यंत्रणा आणि किट उपलब्ध नसल्याने ही संख्या उघड झालेल्या आकड्यांपेक्षा अधिक असू शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाने आता अमेरिकेला कवेत घ्यायला सुरू केले असून स्पेनमध्येही मागील चोवीस तासांमध्ये नऊशेजणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. स्पेनमध्ये या विषाणूने आत्तापर्यंत ११ हजारांपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेतला आहे.  मृतांच्याबाबतीत इटली प्रथमस्थानी असली तरीसुद्धा फ्रान्स,  बेल्जियम आणि ब्रिटनमधील मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ५६९ लोक मरण पावल्याने तेथील सरकारने नव्याने काही तात्पुरती रुग्णालये उभारायला सुरुवात केली आहे.

loading image
go to top