म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्षांचा 'अमर' खेकडा

शास्त्रज्ञांचा दावा
म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्षांचा 'अमर' खेकडा
म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्षांचा 'अमर' खेकडाsocial media
Summary

इतिहासात पहिल्यांदाच 100 दशलक्ष वर्ष जुना खेकडा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.

आपल्याला विज्ञान कधीकधी अशा शोधांकडे घेऊन जाते, ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. असाच एक शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इतिहासात पहिल्यांदाच 100 दशलक्ष वर्ष जुना खेकडा सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. हा खेकडा म्यानमारमध्ये आढळला आहे. एखाद्या ज्युरासिक पार्क चित्रपटाच्या सीनप्रमाणे हि माहिती कुतूहल निर्माण करणारी ठरलेली आहे.

म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्षांचा 'अमर' खेकडा
काय सांगताय! 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई

विशेष म्हणजे अंबरमध्ये सापडलेल्या या खेकड्याला शास्त्रज्ञ जिवंत खेकडा मानत असून त्याला 'अमर खेकडा' म्हणत आहे. समुद्राखाली अंबरमध्ये कैद झाल्यामुळे या खेकड्याचा देह अजूनही सुरक्षित आहे. या अमर खेकड्याचे नाव 'क्रेटस्परा अथानाटा' आहे. संशोधकाचा असा विश्वास आहे की, क्रेटस्परा हा समुद्री खेकडा ही नव्हता किंवा तो नेहमी जमिनीवरही राहणारा नव्हता. सागरी जीवनाच्या शोधातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी प्रगती मानली जाते.

डायनासोरच्या काळातील हा खेकडा आता अनेक बाबतीत संशोधनासाठी उपयोगात येणार आहे. हा खेकडा केवळ पाच मिलीमीटर आकाराचा आहे, एखाद्या झाडाच्या राळेत अडकलेला असा पहिलाच जीव आढळला आहे. आतापर्यंत अशा राळेत केवळ किटकच आढळलेले आहे. हे खेकडे घरटी बनवून राहतात.

म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्षांचा 'अमर' खेकडा
बापरे! चक्क मुलाने खाल्ले 16 टूथब्रश अन् लोखंडी खिळे

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे पोस्टडॉक्टरल संशोधक झेवियर लुक म्हणाले की, हा ‘अमर’ खेकडा फार दुर्मिळ आहे, कारण शास्त्रज्ञांना सामान्यतः कीटक, कोळी, विंचू, मिलिपीड्स, पक्षी, साप अंबरमध्ये अडकलेले आढळलेले आहेत. पण ते सर्व जमिनीवरचे जिवंत प्राणी आहेत. पाण्यात राहणारा जीव अंबरमध्ये अडकल्याचे पहिल्यांदाच घडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com