Coronavirus : दिलासादायक ! ११३ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनाला हरवलं

113 Year Old Spanish Woman Isolated In Room For Weeks Beats Coronavirus
113 Year Old Spanish Woman Isolated In Room For Weeks Beats Coronavirus

माद्रिद : स्पेनमधील ११३ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जगातील सर्वात वयस्कर रुग्ण आहेत. ३ मुलांची आई असलेल्या या महिलेला एप्रिलमध्ये कोरोना व्हायरस असल्याचं निदान झालं, त्यानंतर ओल्ड एज केअर होममध्ये त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. कित्येक दिवस त्या कोरोनाशी दोन हात करत होत्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयस्कर लोकांना आरोग्याच्या इतर समस्याही असतात, त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त होतो आणि त्यातून वाचण्याची शक्यता कमी. मात्र, लढण्याची आणि जगण्याची इच्छाशक्ती तीव्र असेल तर अशक्यही शक्य करता येऊ शकतं हे या आजीबाईंनी दाखवून दिलं आहे. या आजीबाईंनी इतर रुग्णांसमोर एक आदर्श निर्माण करत त्या  एक प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. या आजीबाईंनी आपली प्रकृती बरी असल्याचं सांगितलं. मात्र छोट्या छोट्या वेदना अद्यापही कायम आहेत. आपल्या या आजाराशी लढण्याचं बळ देणारे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे तिनं आभार मानले आहेत.

२० लाख कोटी लिहताना अर्थमंत्र्यांकडूनच चूक; मागितली माफी

स्पॅनीश फ्लूसोबतही केले होते दोन हात
१०० वर्षांपूर्वी कोवळ्या वयात स्पॅनिश फ्लूच्या महासाथीतही त्यांनी या रोगाशी दोन हात केले होते. आता त्यांचं वय झालं असलं तरी तरी लढण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती मात्र कमी झाली नाही. शंभरी पार झाली तरी आजाराशी लढा देण्याची ताकद १०० वर्षांपूर्वीप्रमाणेच आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. १९१८-१९१९ला आजीबाईंना स्पॅनिश फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी स्पॅनिश फ्लूवरही त्यांनी मात केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com