US : अमेरिकेतील बारमध्ये जोरदार गोळीबार; 12 जण गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

American police

अमेरिकेत दररोज गोळीबाराच्या बातम्या समोर येत आहेत.

US : अमेरिकेतील बारमध्ये जोरदार गोळीबार; 12 जण गंभीर जखमी

अमेरिकेच्या फिलाडेल्फिया (USA Philadelphia) शहरातील केन्सिंग्टन आणि अॅलेघेनी भागातील एका बारमध्ये काही हल्लेखोरांनी गोळीबार केलाय. या हल्ल्यात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, अमेरिकन पोलिसांनी अद्याप या घटनेची माहिती दिलेली नाही.

अमेरिकेत दररोज गोळीबाराच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या महिन्यात 13 ऑक्टोबरला दक्षिण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातून अशीच बातमी समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 वाजल्यानंतर येथील एका निवासी भागात गोळीबार झाला. यामध्ये पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला होता.

हेही वाचा: Kashmir : सुरक्षा दलांचा लष्कर-ए-तौयबाला मोठा झटका; दहशतवादी अबू हंजलाला अटक

त्याचवेळी फ्लोरिडातील टाम्पा इथं झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. 9 ऑक्टोबरला स्थानिक वेळेनुसार, पहाटे 3 च्या सुमारास गोळीबार झाला होता.

हेही वाचा: भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?