कॅनडातील भारतीय रेस्टॉरंटमध्ये 'आयईडी'चा स्फोट ; 15 जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

टोरोंटो : टोरोंटोजवळील 'बॉम्बे भेल' या भारतीय रेस्टॉरंटमध्ये 'आयईडी'चा स्फोट झाला. बॉम्बे भेल हे रेस्टॉरंट ऑन्टारिओच्या मिस्सिस्साऊगा येथील शॉपिंग प्लाझामध्ये आहे. या आयईडीच्या स्फोटात 15 जण जखमी झाले असून, त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

कॅनडाजवळील टोरोंटो येथे हा आयईडाचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 15 जण जखमी झाले असून, यातील 3 जण गंभीर जखमी आहेत. तर अन्य 12 जण किरकोळ जखमी आहेत, अशी माहिती येथील रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी 'द ग्लोब आणि मेल' या वृत्तपत्राला दिली. याबाबत 'पील रिजन'च्या पोलिसांनी टि्वट करुन सांगितले, की आम्हाला या घटनेची माहिती देणारा फोन हुरोंटारिओ येथील सेंट अँड इग्लिंटन इव्हे येथून रात्री साडेदहाच्या सुमारास आला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. हा स्फोट दोन संशयितांनी घडवून आणला आणि त्यांनी तेथून पळ काढला. या स्फोटादरम्यान नेमके किती लोक रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते, याची माहिती अद्याप समजू शकली नाही. 

दरम्यान, या स्फोटातील जखमींची माहिती घेण्यासाठी टोरोंटोच्या भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला असून, या हेल्पलाईन क्रमांकावरून जखमींची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 injured in IED blast at Indian restaurant in Canada