

एका बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कॅनडामधील मॅनिटोबा शहरात हा भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची परिस्थिती पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मॅनिटोबाचे अधिकारी रॉब हिल यांनी याबाबत माहिती दिली. सुमारे २५ प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस हायवे नंबर १ आणि हायवे नंबर ५ च्या चौकात एका सेमी-ट्रेलर ट्रकला धडकली. या बसमध्ये बहुतांश वयोवृद्ध लोक होते, असं हिल यांनी सांगितलं.
सर्वात भीषण अपघात
'मॅनिटोबा आणि कॅनडासाठी हा एक काळा दिवस आहे', पुढील कित्येक वर्षे या दिवसाची दुःखद आठवण लोकांच्या मनात राहील. या अपघातातील बहुतांश लोक डौफिन प्रांतातील होते. याठिकाणी असणारे लोक आपल्या प्रियजनांबाबत जाणून घेण्यास आतुर आहेत हे मी समजू शकतो. मात्र, सध्या याबाबत मी अधिक माहिती देऊ शकत नाही', असं म्हणत हिल यांनी दिलगिरी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. 'मॅनिटोबातील कार्बेरीमधील घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघाताशी संबंधित लोकांच्या वेदनांची मी कल्पनाही करू शकत नाही. मात्र - कॅनडातील सर्व नागरिक तुमच्या सोबत आहेत.' अशा आशयाचं ट्विट करत जस्टिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.