Cigarette Warning : पाकिटच नव्हे, तर प्रत्येक सिगारेटवर लिहिणार धोक्याचा इशारा! कॅनडा सरकारचा मोठा निर्णय

असा निर्णय घेणारा कॅनडा हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.
Cigarette Warning Canada
Cigarette Warning CanadaEsakal

धूम्रपानामुळे कर्करोग होतो हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. तरीही कित्येक लोक सिगारेट पिण्याची सवय सोडत नाही. लोकांना धूम्रपानामुळे होणारा धोका लक्षात यावा यासाठी सिगारेटच्या प्रत्येक पाकिटावर इशारा देण्यात आलेला असतो. कॅनडाने मात्र याहीपेक्षा एक पाऊल पुढे टाकत, प्रत्येक सुट्या सिगारेटवर असा इशारा देण्याचा निर्णय घेतला आहे.

असा निर्णय घेणारा कॅनडा हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. बुधवारी (३१ मे) जगभरात नो टोबॅको डे साजरा करण्यात आला. या निमित्ताने कॅनडामध्ये सिगारेट बाबतच्या या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

Cigarette Warning Canada
Smoking Habit : चहा-कॉफीसोबत सिगारेट ओढत असाल तर होतील गंभीर परिणाम

दोन भाषांमध्ये असणार इशारा

"धूम्रपानामुळे मुलांचे नुकसान होते", "धूम्रपानामुळे ल्युकेमिया होतो" तसंच "प्रत्येक पफमध्ये विष आहे" अशा आशयाचे इशारे सिगारेटवर लिहिण्यात येणार आहेत. हे इशारे इंग्रजी आणि फ्रेंच अशा दोन्ही भाषांमध्ये असतील.

"धूम्रपानाचे व्यसन लागलेल्या व्यक्तींना सिगारेटपासून दूर ठेवणं, तरुणांना निकोटीनचं व्यसन लागू नये यासाठी प्रयत्न करणं आणि एकूणच तंबाखूची तल्लफ कमी करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. सिगारेट पॅकेजिंग आणि लेबलिंगच्या या निर्णयामुळे लोकांना सिगारेटच्या धोक्याचे इशारे टाळता येणार नाहीत." असं कॅनडाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

Cigarette Warning Canada
Smoking Side Effects: धुम्रपानामुळे Heart होवू शकत कमकुवत आणि जाड, काय सांगतंय नवं संशोधन?

कॅनडा सरकारची मोहीम

कॅनडा सरकारने २०३५ पर्यंत देशातील एकूण तंबाखू खाण्याचे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे. हा निर्णय देखील याच मोहिमेचा एक भाग आहे. एक ऑगस्टपासून या निर्णयाची टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

देशातील प्रत्येक किंग-साईज सिगारेटवर धोक्याचा इशारा देण्यासाठी एप्रिल २०२४ ही डेडलाईन सेट करण्यात आली आहे. तर, प्रत्येक रेग्युलर साईज सिगारेटसाठी एप्रिल २०२५ ही डेडलाईन सेट केली आहे.

"कॅनडामध्ये तंबाखूमुळे दरवर्षी कित्येक तरुण व्यक्तींचा बळी जात आहे. त्यामुळे देशातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत", असं मत कॅनडाच्या आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Cigarette Warning Canada
Quit Smoking: स्मोकिंगला करा कायमचा बाय; करा हे उपाय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com