एच-१ बी व्हीसामध्ये १५ कोटी डॉलर गुंतवणार

पीटीआय
Saturday, 26 September 2020

अमेरिकेच्या कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सध्याच्या कर्मचाऱ्यांची कौशल्य अद्ययावत करण्याबरोबरच नवीन पिढीलाही कर्मचाऱ्यांची नवी पिढी तयार करण्यासाठीही केला जाणार आहे.

वॉशिंग्टन - मध्यम ते उच्च कौशल्य आवश्‍यक असलेल्या एच-१ बी व्हीसा क्षेत्रात प्रशिक्षणासाठी अमेरिका सरकार १५ कोटी डॉलर गुंतवणूक करणार आहे. एच-१ बी व्हीसाच्या मदतीने लाखो विदेशी कर्मचारी अमेरिकी कंपन्यांमध्ये काम करतात. या व्हीसाच्या आधारे अमेरिकेत आलेले कर्मचारी बहुतांशी माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, उत्पादन आणि वाहतूक या क्षेत्रांत काम करतात.  

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेच्या कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सध्याच्या कर्मचाऱ्यांची कौशल्य अद्ययावत करण्याबरोबरच नवीन पिढीलाही कर्मचाऱ्यांची नवी पिढी तयार करण्यासाठीही केला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे कामगार क्षेत्रात केवळ अडचणीच निर्माण झाल्या नाहीत तर, अनेक संस्थांना त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमावरही फेरविचार करावा लागला. यामुळे अमेरिका सरकारने नव्या आव्हानांना कर्मचाऱ्यांना सामोरे जाता येईल, असा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला जाणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी कालावधी
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील वास्तव्याचा कालावधी निश्‍चित करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने सरकारसमोर ठेवला आहे. या प्रस्तावानुसार, शिक्षणासाठी अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा वास्तव्याचा कालावधी, सांस्कृतिक देवाणघेवाण, विदेशी पत्रकारांसाठी कालमर्यादा, ठरवून दिलेली कालमर्यादा वाढवून देण्याची प्रक्रिया याबाबत नियम ठरविले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 million Dollars to invest in the H-1B visa