फेसबुकवर फोटो टाकल्याने मुलाचा आईवर खटला

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जानेवारी 2018

रोम - सोशल मिडियाचा वापर करताना आपण इतके सरावलो आहेत की आपल्या जवळच्या व्यक्तिंचे फोटो सोशल मिडियावर सहज पोस्ट करत असतो. प्रसंगी त्यांना टॅगही करतो. यामध्ये आपल्याला काही गैर वाटत नाही. परंतु, एका सोळा वर्षाच्या मुलाने या कारणासाठी आपल्या आईलाच कोर्टात खेचले. कोर्टाने देखील या मुलाच्या बाजूने निकाल दिला आहे. 

झाले असे की, इटलीमधील एका मुलाने आपल्या परवानगी शिवाय फेसबुकवर फोटो टाकल्याने आपल्या आईवरच खटला दाखल केला होता. तसेच अशा प्रकारे सोशल मिडियावर फोटो टाकल्याने आपल्या शालेय जीवनावर परिणाम होत असल्याचा आरोपही त्याने केला होता. डिसेंबर महिन्यात याबाबत सुनावणी झाल्यानंतर सत्र न्यायलयाच्या न्यायाधीश मोनिका वेलेट्टी यांनी याबाबत मुलाच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला. तसेच कोर्टाने आईला मुलाचे फोटो फेसबुकवरुन डिलीट करण्यास सांगितले आहे. यासाठी आईला 1 फेब्रुवारी 2018 पर्यंतची मुदतही देण्यात आली आहे.  

इटलीमधील प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाच्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर आई आणि मुलामध्ये देखील वाद सुरु झाला होता. हा वाद सोशल मिडियावर देखील जगजाहीर झाला. त्यामध्ये आपला मुलगा मानसिक रुग्ण असल्याचे म्हणत आईने या मुलाचे अनेक फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. या प्रकाराला वैतागुन आपल्या आयुष्यातील काही खासगी बाबी देखील आईने सोशल मिडियावर टाकल्याने या मुलाने अशा प्रकारचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16-Year-Old Takes Mother to Court for Posting Photos of Him on Facebook

टॅग्स