दक्षिण आफ्रिकेच्या नाईट क्लबमध्ये 17 जणांचा संशयास्पद मृत्यू; क्लबमध्ये सर्वत्र आढळले मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nightclub in south africa

आज सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्नमध्ये ही घटना घडलीय.

दक्षिण आफ्रिकेच्या नाईट क्लबमध्ये 17 जणांचा संशयास्पद मृत्यू

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) पूर्व लंडनमधील नाईट क्लबमध्ये (Nightclub) 17 जणांचा मृत्यू झालाय. या सर्व लोकांचा मृत्यू का झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय. एएफपी या वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिलीय.

एएफपीनं पोलिसांच्या हवाल्यानं सांगितलं की, रविवारी पहाटे सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्नमध्ये ही घटना घडलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही प्रकारचं विष प्राशन केल्यामुळं लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. परंतु, नेमकं कारण समजू शकलं नाहीय. डेली डिस्पॅच न्यूज साइटनुसार, पूर्व लंडनच्या केप प्रांताच्या काठावर असलेल्या सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्न इथं रविवारी पहाटे ही घटना घडलीय.

ईस्टर्न केप पोलिसांचे (Eastern Cape Police) प्रवक्ते ब्रिगेडियर टेम्बिंकोसी किनाना यांनी सांगितलं की, 'मृतांमध्ये १८ ते २० वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. नाईट क्लबच्या केबिनमध्ये 17 लोक मृतावस्थेत आढळले. आज पहाटे या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. घटनेच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास केला जात आहे. क्लबमध्ये सर्वत्र मृतदेह आढळून आले, परंतु कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा नाहीयत.'

टॅग्स :South AfricaLondon