आश्चर्यच! 19 वर्षांचा युवक दिसतोय 9 वर्षाच्या मुलासारखा

हा 'व्यक्ती' सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.
19 वर्षांचा युवक दिसतोय 9 वर्षाच्या मुलासारखा
19 वर्षांचा युवक दिसतोय 9 वर्षाच्या मुलासारखाesakal
Updated on
Summary

हा 'व्यक्ती' सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची उंची (Height) सामान्य लोकांच्या उंचीइतकी वाढत नाही. अनेकदा अशा लोकांना त्यांच्या उंचीची खूप काळजी वाटते . अनेक वेळा लोकांना विचित्र आजार (Weird Diseases that reduce height) देखील होतात, ज्यामुळे त्यांची उंची कमीच राहते. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो केवळ आकारानेच नाही तर त्याच्या दिसण्यातही लहान मुलासारखा (Man Looks Like Child) दिसतो. जो कोणी त्याला पाहतो तो त्याला लहानच समजतो. हा 'व्यक्ती' (Child Like Man Looks Like Child) सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.

19 वर्षांचा युवक दिसतोय 9 वर्षाच्या मुलासारखा
कोरोनाकाळात काय आहेत सोशल मीडिया ट्रेंड सर्च ; जाणून घ्या

देगिस्तानमध्ये (Degistan) राहणारा सोशल मीडिया प्रभावशाली (इंफ्लूएंसर) हसबुल्ला मॅगोमेडोव्ह (Hasbulla Magoemedov) केवळ यातच रुसमध्येच(Russia) नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. हसबुल्लाहच्या प्रसिद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे दिसणे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हसबोल्लाह हा 19 वर्षांचा आहे, परंतु दिसण्यात तो 9 वर्षांच्या मुलापेक्षा लहान दिसतो (19 Year Old Man Looks Like 9 Year Old Boy). त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर, कोणीही त्याच्या प्रेमात पडू शकतो, परंतु जेव्हा एखाद्याला सोशल मीडियावर आपल्या वर्चस्वासाठी प्रसिद्ध असलेल्या हसबुल्लाहबद्दल पूर्णपणे माहिती मिळू लागते, तेव्हा तो थक्क होतो. हसबोल्लाच्या शरीरात ग्रोथ हार्मोन्सची ((Growth Hormones)) कमतरता आहे. म्हणूनच त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे दिसते.

19 वर्षांचा युवक दिसतोय 9 वर्षाच्या मुलासारखा
मित्रांनो, सोशल मीडिया सोडा, स्वतःला घडवा

इंस्टाग्रामने ब्लॉक केले अकाउंट

सोशल मीडियावर हसबुल्लाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कधी तो जिममध्ये घाम गाळताना दिसतो तर कधी कुस्तीच्या सामन्याचा आनंद घेताना दिसतो. पण यावेळी हसबुल्ला एका वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याने इंस्टाग्रामवर एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर इंस्टाग्रामने त्याचे अकाउंट ब्लॉक केले आहे.

महिलेला धमकी

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेने हसबुल्लाहच्या बहिणीशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर त्याने धमकी दिली आणि म्हणाला, या महिलेने संपूर्ण इंस्टाग्रामवर दाखवण्यासाठी माझ्या बहिणीचा व्हिडिओ शेअर केला. जर त्याने संपूर्ण सोशल मीडियावर माफी मागितली नाही तर मी तिला जिवंत सोडणार नाही. जेव्हापासून वाद वाढला तेव्हापासून त्याने स्पष्टीकरण दिले की त्याने धमकी दिली आहे, परंतु त्याचे खाते इंस्टाग्रामने ब्लॉक केलेले नाही. त्यांनी स्वतःच काही दिवसांसाठी त्यांचे खाते ब्लॉक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com