esakal | मित्रांनो, सोशल मीडिया सोडा, स्वतःला घडवा; युपीएससीच्या आयईएसमध्ये देशात प्रथम आलेल्या चारुदत्त साळुंखेंचा तरुणांना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Charudatta Salunkhe

मित्रांनो, सोशल मीडिया सोडा, स्वतःला घडवा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : मित्रांनो, आपला जास्तीतजास्त वेळ स्वतःला घडवण्यात घालवा. सकारात्मक विचार ठेवा आणि सोशल मीडियाला बळी न पडता आपल्या परिस्थितीचा विचार करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर ध्येय साध्य करा. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी मराठी माध्यमातून शिकूनही देशात पहिला क्रमांक पटकवण्याचे ध्येय साध्य केलंय. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत देशात पहिला आलेला चारुदत्त साळुंखे अभिमानाने सांगत होता.

पाटण तालुक्‍यातील चाफळ हे चारुदत्त याचे मूळ गाव. त्याचे आई-वडील दोघेही कऱ्हाडला शिक्षक आहेत. त्यामुळे त्यांचे वास्तव्य कऱ्हाडमध्ये आहे. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्यामंदिरमधून, पाचवी ते दहावीपर्यंतचे कऱ्हाडच्या शिवाजी हायस्कूलमधून, तर बारावीपर्यंतचे शिक्षण एसजीएम महाविद्यालयातून झाले. बारावीनंतर त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली. पुण्यात शिक्षण घेतानाच कॅम्पस इंटव्यूहमधून त्याला खासगी नोकरीच्या संधी आल्या. मात्र, त्याने त्या नाकारून शासकीय सेवेत जाऊन देशसेवेसाठी काम करण्याची जिद्द ठेवली. त्याने 2017 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगातूनच पहिल्या क्रमांकाने पास होण्याचे ध्येय ठेऊन वाटचाल केली.

त्याबाबत सांगताना चारुदत्त म्हणाला, ""मी युपीएससीतूनच पास व्हायचे ठरवून भविष्याचा विचार करत न बसता अभ्यास करत राहिलो. स्वतःला शिस्त लावून घेतली. चार वर्षे सातत अभ्यास केला. त्याचदरम्यान कोरोना आला. त्यामुळे परीक्षा होणार का? वर्ष वाया जाणार का? अशा अनेक प्रश्नांच्या काहुरामुळे अनेक जण घाबरून डिमोटिव्हेट झाले. मात्र, मी माझ्या मनाला पहिल्या क्रमाकांसाठीच झटण्याचे सातत्याने सांगून अभ्यास करत होतो. त्यातूनच मला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या क्रमांकाचे यश मिळाले. मित्रांनो आपला उमेदीतील जास्तीतजास्त वेळ राजकारणात, सोशल मीडियावर न घालवता स्वतःला घडवण्यात घालवा. सकारात्मक विचार ठेऊन आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट आठवून अभ्यास करा. जिद्द व चिकाटीच्या जोरावर निश्‍चित यश मिळते हे मी साध्य केले आहे.''

बिकट प्रसंगातूनही केला अभ्यास

केंद्रीय लोकसेवा आयोगाची महिन्यावर परीक्षा आली असतानाच वडिलांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सेवेसाठी मला थांबवे लागले. त्यादरम्यान मी मिळेल त्या वेळेमध्ये अभ्यास करत होतो. मात्र, अपेक्षित अभ्यास होत नव्हता. त्यामध्ये बरेच दिवस गेले. मात्र, वडिलांना बरे वाटायला लागल्यावर पुन्हा दहा ते बारा दिवस जीव लावून अभ्यास केला. त्या वेळीही मी माझे मन विचलित होऊ दिले नाही. त्यामुळेच मला यशाला गवसनी घालता आली आणि माझ्या कष्टाचे चीज झाले, असे त्याने सांगितले.

दुबईच्या राजाच्या मुलीने घरातून पलायन केल्याची घटना साधारण तीन वर्षांपूर्वी चर्चेत आली होती.

Edited By : Siddharth Latkar