Accident News : पाकिस्तानात भीषण रस्ता अपघात; बस-टँकरच्या धडकेत 20 ठार, 6 जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Accident News

पाकिस्तानातून एक वेदनादायक रस्ता अपघाताची बातमी समोर येत आहे.

Accident News : पाकिस्तानात भीषण रस्ता अपघात; बस-टँकरच्या धडकेत 20 ठार, 6 जण जखमी

Pakistan Accident News : पाकिस्तानातून एक वेदनादायक रस्ता अपघाताची बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, या रस्ता अपघातात 20 जणांचा मृत्यू झालाय, तर 6 जण जखमी झाले आहेत. बस ऑईलनं भरलेल्या टँकरला धडकल्यानं हा अपघात झाला.

टक्कर होताच टँकर आणि बसनं (Tanker-Bus Accident) पेट घेतला. मुल्तान-सुक्कूर मोटरवेवर पहाटे हा अपघात झालाय. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. मात्र, अपघातातील 20 जणांचे प्राण वाचवण्यात अपयश आलंय. या घटनेची पुष्टी करताना मुल्तानचे (Multan) उपायुक्त ताहिर वातू यांनी सांगितलं की, 'लाहोरहून कराचीला जाणारी बस जलालपूर पिरवालाजवळ तेलाच्या टँकरला धडकली, त्यामुळं हा मोठा अपघात झाला. या धडकेनंतर टँकरला आग लागली आणि त्यात 20 जणांचा मृत्यू झाला.'

हेही वाचा: Telangana : तिरंगा फडकवल्यानंतर काही मिनिटांतच TRS नेत्याची हत्या

मुल्तानचे आयुक्त अमीर खट्टक यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. मुल्तान पोलिसांनी (Multan Police) ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिलीय. यासोबतच चार फोटोही शेअर केलेत. फोटोमध्ये आगीत टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलंय. डॉननं दिलेल्या वृत्तानुसार, 'टँकरमध्ये हजारो लिटर तेल भरलं होतं.'

हेही वाचा: Subhash Singh : भाजप आमदार सुभाष सिंह यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

Web Title: 20 Killed 6 Injured In Bus And Tanker Accident In Multan Pakistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..