Earthquake In Indonesia: जकार्तामध्ये शक्तीशाली भूकंप! 46 ठार, 700 हून अधिक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake In Indonesia

Earthquake In Indonesia: जकार्तामध्ये शक्तीशाली भूकंप! 46 ठार, 700 हून अधिक जखमी

इंडोनेशियामधील जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात 46 जणांचा मृत्यू झाला असून 700 जण जखमी आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाल्याची माहिती देखील समोर आलीआहे.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये 10 किमी खोलीवर होता. मात्र, यामुळे सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Navale Bridge Accident: नवले ब्रिज जवळ पुन्हा भीषण अपघात! 26 गाड्या एकमेकांवर आदळल्या; ६ ते १० जण जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, जकार्तामध्ये भूकंपानंतर लोक घाबरले. त्यांच्या कार्यालयात काम करणारे लोकही बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरत असल्याचे दिसून आले. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

याआधी शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून 202 किमी नैऋत्येस 25 किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता 5.4 होती.

हेही वाचा: Kohli-Dhoni : सर्वत्र धोनी! चक्रावलेल्या विराट कोहलीनं इन्स्टावर केलेली पोस्ट चर्चेत

टॅग्स :EarthquakeIndonesia